एक्स्प्लोर
Advertisement
पार्थ, सुजयनंतर आता आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात?
एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील लोकसभा लढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील लोकसभा लढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधुन आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुक लढतील अशी चर्चा सुरु आहे. उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ भाजपकडे आहे तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे. उत्तर मध्य मतदारसंघात पूनम महाजन खासदार आहेत तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत.
ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कोणीही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणुक लढवलेली नाही. आदित्य ठाकरे यांनी मुंबई जिल्हा फुटबाॅल असोसिएशनची निवडणुक जिंकली आहे. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्षपदही सांभाळत आहे. त्यांची तरुण मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे, शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लास रुम, ओपन जिम तसेच मुंबईत स्वच्छ शौचालय ही कामं चांगलीच गाजली आहेत.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संजय काकडे काँग्रेस प्रवेशावर ठाम
'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर डॉ. अमोल कोल्हे मालिकांतून विश्रांती घेणार
नाव न घेता उद्धव ठाकरेंचा अमोल कोल्हेंवर निशाणा | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement