(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Exit Poll 2022: गोव्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Goa Exit Poll 2022 : गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. निकालानंतर गोव्यात तडजोडीनं सरकार स्थापन करावं लागण्याचा अंदाज सर्व्हेनं व्यक्त केला आहे.
ABP Cvoter Goa Exit Poll Result 2022 : गोव्यात सत्तास्थापनेसाठी घमासान होण्याची शक्यता आहे.. याचं कारण गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही . त्यामुळे गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. निकालानंतर गोव्यात तडजोडीनं सरकार स्थापन करावं लागण्याचा अंदाज सर्व्हेनं व्यक्त केला आहे.
गोव्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. गोव्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आहे. गोव्यात भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉंग्रेसला 12 ते 16 जागा मिळणार आहे. आपला 1 ते 5, मगोपला 5 ते 9 आणि इतरांना 0 ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरने दिलेल्या आकडेवारीनुसार मगोप किंगमेकरच्या भूमीकेत दिसणार आहे.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान?
वोट शेअरबद्दल बोलायचे तर भाजपला सर्वाधिक मत मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजपला 32.7 टक्के मत मिळणार आहे. तर कॉंग्रेसला 30.2 मत मिळण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला 14.5, मगोपला 10.5 टक्के आणि इतरांना 12.2 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.
2017 चा निकाल?
2017 साली कॉंग्रेसला 28.4 टक्के मत मिळाली होती. तर भाजपला 32.5, आम आदमी पक्षाला 6.3, मगोपला 11.3 आणि इतरांना 21.5 टक्के मतदान मिळाले होते. 2022 च्या निवडणुकात आम आदमी पक्षाला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाच्या आकडेवारीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तर कॉंग्रेस पक्षाला सर्वाधक मते मिळणार आहे. कॉंग्रेसच्या पदरात 17 जागा पडल्या होत्या. 13 जागा मिळवणाऱ्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्षाना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. आपला 2017 साली गोव्यात खाते उघडता आले नाही. तर एमजीपीला 3 आणि इतर पक्षांना सात जागा मिळाल्या होत्या.
संबंधित बातम्या :
ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?
ABP Cvoter Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेस चुरशीची लढत, पाहा काय सांगतोय एक्झिट पोल
Goa Exit Poll 2022 : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही