एक्स्प्लोर
'आप' महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार, केजरीवालही प्रचार करणार
या निवडणुकीत 'आप' अनेक जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवालसह अनेक नेते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रचारही करणार आहेत.
मुंबई : दिल्लीच्या सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाने आता महाराष्ट्रातील राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाने शुक्रवारी (23 ऑगस्ट) केली. निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीसाठी पक्षनेतृत्त्वाने राज्यात निवडणूक समितीची स्थापनाही केली आहे.
या निवडणुकीत 'आप' अनेक जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवालसह अनेक नेते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रचारही करणार आहेत. "महाराष्ट्र सरकार अनेक मुद्द्यांवर सपशेल अपयशी ठरली आहे, अशा परिस्थितीत संकटग्रस्त नागरिकांच्या हितासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे," अशी घोषणा आम आदमी पक्षाने केली.
युती सरकार अपयशी : दुर्गेश पाठक
पक्षाच्या निर्णयाची माहिती देताना महाराष्ट्रातील पक्षाचे प्रभारी दुर्गेश पाठक यांनी भाजप आणि शिवसेना युती सरकारवर निशाणा साधला. पाच वर्षांपूर्वी नागरिकांनी तत्कालीन काँग्रेस सरकराला कंटाळून परिवर्तनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला बहुमत दिलं होतं. पण हे सरकारही सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरलं आहे, असं दुर्गेश पाठक म्हणाले.
'मजबूत पर्याय देण्यासाठी काम करणार'
दुर्गेश पाठक म्हणाले की, "आम आदमी पक्ष राज्यातील लोकांना एक मजबूत पर्याय देण्याच्या दिशेत काम करेल आणि याच उद्देशाने राज्यात पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीत सहभागी होईल." "निवडणुकीच्या तयारीसाठी आम आदमी पक्षाने एका समितीचीही स्थापन केली आहे.
दिल्लीबाहेर 'आप'चा विजय नाही
महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षही जोरदार तयारी करत आहेत. आता यात आम आदमी पक्षाचाही समावेश होणार आहे. आम आदमी पक्षाने याआधी हरियाणा, पंजाब आणि गोव्यात विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु तिन्ही राज्यात पक्षाला विशेष यश मिळालं नव्हतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement