एक्स्प्लोर

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 10 जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या 10 जागांपैकी हिंगोली आणि नांदेड या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या उरलेल्या आठ जागा युतीने जिंकल्या होत्या.

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या 10 जागांपैकी हिंगोली आणि नांदेड या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या उरलेल्या आठ जागा युतीने जिंकल्या होत्या. बीड : या मतदारसंघात 68.75 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 92 हजार 652 मतदारांपैकी 12 लाख 32 हजार 390 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपचे गोपीनाथ मुंडे यांना 6 लाख 35 हजार 995 मतं पडली होती तर तेव्हा राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या आमदार सुरेश धस यांना 4 लाख 99 हजार 541 मतं पडली होती. गोपीनाथ मुंडे 1 लाख 36 हजार 454 मतांनी विजयी झाले होते. केंद्रात मोदी सरकारमध्ये मुंडे मंत्री सुद्धा बनले होते मात्र दुर्दैवाने शपथविधीच्या आठवड्याच्या आत त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यांच्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांची कन्या प्रीतम मुंडे-खाडे या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या होत्या. सुरेश धस आता भाजपमध्ये आले आहेत. सोलापूर : या राखीव मतदारसंघात 55.58 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 2 हजार 739 मतदारांपैकी 9 लाख 51 हजार 201 मतदारांनी मतदान केलं. भाजपच्या नवख्या शरद बनसोडे यांनी देशाचे तत्कालिन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दिड लाख मतांनी धक्कादायक पराभव केला होता. बनसोडेंना 5 लाख 17 हजार 879 मतं पडली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 68 हजार 205 मतं पडली होती. यंदा इथे तिहेरी लढत रंगणार आहे. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंसमोर मोठं आव्हान आहे, भाजपने जयसिद्धेश्वर स्वामींना तिकीट दिलं आहे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर इथून लढत आहेत. नांदेड : मोदी लाटेत काँग्रेसने वाचवलेल्या या मतदारसंघात 16 लाख 87 हजार 57 मतदारांपैकी 60.11 टक्के म्हणजे 10 लाख 10 हजार 262 मतदारांनी मतदान केलं होतं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 81 हजार 455 मतांनी विजयी झाले होते. अशोक चव्हाण यांना 4 लाख 93 हजार 75 मतं पडली होती तर भाजपच्या डी. बी. पाटील यांना 4 लाख 11 हजार 620 मतं पडली होती. निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिल्यानंतरही अखेरच्या क्षणी अशोक चव्हाण इथून पुन्हा लढत आहेत. त्यांच्यासमोर सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या प्रतापराव चिखलीकरांचं आव्हान आहे. हिंगोली : मोदी लाटेत काँग्रेसला मिळालेली दुसरी जागा म्हणजे. या मतदारसंघात 66.29 टक्के म्हणजेच 15 लाख 86 हजार 194 पैकी 10 लाख 51 हजार 477 मतदारांनी मतदान झालं होतं. काँग्रेसचे राजीव सातव अवघ्या 1632 मतांनी विजयी झाले होते. सातवांना 4 लाख 67 हजार 393 मतं तर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंना 4 लाख 65 हजार 765 मतं पडली होती. यंदा सातव निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर आहेत तर गेल्यावेळी शिवसेनेकडून लढलेले सुभाष वानखेडे यंदा काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहेत. उस्मानाबाद : या मतदारसंघात 63.65 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 59 हजार 186 मतदारांपैकी 11 लाख 19 हजार 704 मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेच्या रविंद्र गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 मतं पडली होती तर राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मतं पडली होती. गायकवाड 2 लाख 34 हजार 325 मतांनी विजयी झाले होते. लातूर : या राखीव मतदारसंघात 62.69 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 86 हजार 957 मतदारांपैकी 10 लाख 57 हजार 579 मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपचे डॉ. सुनील गायकवाड 2 लाख 52 हजार 33 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 6 लाख 14 हजार 557 तर काँगेसच्या दत्तात्रय बनसोडे यांना 3 लाख 62 हजार 524 मतं पडली होती. परभणी : 64.44 टक्के मतदान झालं होतं. 18 लाख 3 हजार 792 मतदारांपैकी 11 लाख 62 हजार 371 मतदारांनी मतदान केलं. शिवसेनेच्या बंडु जाधव यांना 5 लाख 78 हजार 67 मतं पडली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 108 मतं पडली होती. बंडु जाधव 1 लाख 26 हजार 959 मतांनी जिंकले होते. अकोला : मतदारसंघात 58.51 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 72 हजार 643 मतदारांपैकी 9 लाख 78 हजार 630 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे संजय धोत्रे 2 लाख 3 हजार 116 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 4 लाख 56 हजार 472 मतं पडली होती. काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना 2 लाख 53 हजार 356 मतं पडली तर भारीप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 38 हजार 776 मतं पडली होती. याच तीन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये यंदासुद्धा लढत रंगणार आहे. अमरावती : या राखीव मतदारसंघात 62.29 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 12 हजार 739 मतदारांपैकी 10 लाख 1 हजार 63 मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे आनंदराव अडसुळ 1 लाख 36 हजार 807 मतांनी विजयी झाले होते. त्यांना ४ लाख ६५ हजार ३६३ मतं पडली होती तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या नवनीत राणा यांना 3 लाख 28 हजार 556 मतं पडली होती. यंदा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकमेकासमोर उभे आहेत. बुलढाणा : मतदारसंघात 61.35 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 95 हजार 435 मतदारांपैकी 9 लाख 78 हजार 886 मतदारांनी मतदान केलं. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना 5 लाख 9 हजार 145 मतं पडली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृष्णराव इंगळे यांना 3 लाख 49 हजार 534 मतं पडली होती. जाधव 1 लाख 59 हजार 579 मतांनी विजयी झाले होते. वाचा : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान झालं, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget