एक्स्प्लोर
Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील दहा निर्णय
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरीतील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा स्थगित करुन तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. बैठकील सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (07 ऑगस्ट) बैठक पार पडली. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरीतील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा स्थगित करुन तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. बैठकील सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सोबत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. या दहा निर्णयांवर एक नजर...
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :07 ऑगस्ट 2019
1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.
2. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.
3. जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.
4. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करुन त्यासाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत.
5. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.
6. गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.
7. चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.4 अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. 4 आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.
8. विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत.
9. तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबत.
10. प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement