UPSC वर विद्यार्थ्यांचा संताप, पेपर अवघड नव्हे, तर 'Luck'च्या आधारे, नेमकं प्रकरण काय?
UPSC Exam: UPSC 2026 ची पूर्वपरीक्षा 24 मे रोजी घेण्यात आली. या पेपरमध्ये 400 मार्कांसाठी 180 प्रश्न विचारण्यात आले. मात्र परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली.

- अजय धनजे
UPSC Exam 2026: UPSC 2026 ची पूर्वपरीक्षा (UPSC Prelims Exam 2026) 24 मे रोजी घेण्यात आली. दोन सेटमध्ये घेण्यात आलेल्या या पेपरमध्ये 400 मार्कांसाठी 180 प्रश्न विचारण्यात आले. मात्र परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. यावर्षीचा हा पेपर पुर्णपणे इरिलीवंट, लांबलचक प्रश्न, गोंधळात टाकणारा,नॉन सिलॅबस बेस्ड आणि विद्यार्थ्यांना थकवणारा असा पेपर UPSC ने काढल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली आहे. ह्यावर्षी 8 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी UPSC चा फॉर्म भरला आहे, मात्र ज्या प्रकारचा प्रिलीम्सचा पेपर काढला गेला त्यानुसार कट ऑफ खूप खाली जाण्याची चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
UPSC Exam 2026 : UPSC देणारे विद्यार्थी का संतापले?
UPSC चा GS पेपर 1 मध्ये सुमारे 200 मार्कांसाठी 100 प्रश्न विचारण्यात आले आणि वेळ फक्त 2 तास एका प्रश्नासाठी साधारण 1 मिनीट 20 सेकंद्र मिळतात, मात्र GS 1 मध्ये एवढे लांबलचक प्रश्न विचारण्यात आले ज्यांना वाचायलाच साधारण मनुष्याला 3-4 मिनीट लागतील. प्रश्न असे विचारलेत की तुम्ही कितीही अभ्यास करा पण तुमचे उत्तर हे तुमचं नशीब असेल तरच बरोबर येणार अशी एका विद्यार्थ्याने टीका केली आहे. मुलांसाठी प्रश्न वाचून उत्तर सोडणे अवघड नव्हते मात्र ज्या फॉरमॅट मध्ये टफ पेपर काढण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले त्यातच मुलांचा वेळ वाया गेल्याचं एका शिक्षकाने म्हटलं आहे.
UPSC Exam : UPSC च्या चेअरमन आणि परिवाराल चॅलेंज?
UPSC चे कोचिंग देणार शिक्षक अमित किल्होर यांनी हा किचकट पेपर बगून थेट UPSC चेअरमन अजय कुमार आणि पेपर काढणाऱ्या शिक्षकांना चॅलेंज दिलं आहे की तुम्ही हा पेपर सोडवून फक्त 200 पैकी 80 मार्क्स घेऊन दाखवा तुम्ही सांगणार ते विद्यार्थी करतील. फक्त अवघड पेपर सिध्द करण्यासाठी UPSC ने अर्थ नसलेले प्रश्न विचारले आणि लांबलचक करून आम्ही काहीतरी आजपर्यंत वेगळ करतोय हे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांच आयुष्य उध्वस्थ करत आहेत . अशी टीका सुध्दा त्यांनी केली आहे.
ChatGPT, Gemini आणि Cloud Ai गोंधळात पडले?
UPSC GS पेपर 1 मधील 89 क्रमांकाचा प्रश्न एवढा किचकट आणि अवघड होता की. ह्या तीनही AI टुल्सनीं तीन वेगळे उत्तर दिले. आणि ह्यांना पण इंटरनॅशनल रिलेशना प्रश्न अवघड वाटला. पुढे नोबेल संदर्भातील एक प्रश्न असा विचारला की कोणत्या विषयात कुणाला नोबेल विचारला हे विचारण्या ऐवजी X व्यक्तीला नोबेल मिळाला तेंव्हा तो अमेरिकेच्या विद्यापीठात प्राध्यापक होता सांगा कोण? ज्या विद्यार्थ्यांनी त्या नोबेल विजेत्याची बायोग्राफी वाचली नसेलं, तो कसं सांगू शकणार की नोबेल मिळालं तेंव्हा हा व्यक्ती कुठल्या विद्यापीठात प्राध्यापक होता.
UPSC Exam : कट ऑफ खाली जाणार, लक फॅक्टर वाढणार?
X वर सुमीत नावाचा विद्यार्थी लिहीतो की जर पेपर अवघड आलाय तर कट ऑफ सुध्दा कमी लागेलं, मग चिंता का करायची त्यावर अमित किल्होर लिहीतात की जेवढा कट ऑफ फॅक्टर खाली जाणार तेवढा UPSC मध्ये लक फॅक्टर वाढणार, मग तासंतास एवढा अभ्यास करून विद्यार्थ्यांचा उपयोग काय?आणि हे एवढा अभ्यास वाया जाऊन निकाल हा फक्त लक फॅक्टरवर लागणार.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI





















