UGC NET Final Answer Key: UGC NET 2023: युजीसी नेट परीक्षेची Answer Key जारी, अशी करा डाउनलोड
UGC NET Final Answer Key: UGG NET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी NTA ने नुकत्याच पार पडलेल्या नेट परीक्षेची Final Answer Key जारी केली.
UGC NET Final Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षेची (UGC-NET) Answer Key जारी केली आहे. ज्यांनी 21 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान झालेली युजीसी नेट परीक्षा दिली असेल, अशा परीक्षार्थींना आपली उत्तेर पडताळून पाहता येणार आहेत. ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावरून ही उत्तरे डाउनलोड (UGC NET Final Answer Key) करता येणार आहे.
UGC NET डिसेंबर परीक्षा देशभरातील 663 केंद्रावर 32 सत्रात, 16 दिवस 83 विषयांसाठी पार पडली. ही परीक्षा पाच टप्प्यात घेण्यात आली होती. परीक्षा 21 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान पार पडली होती. अंतरीम UGC NET 2023 Answer Key 23 मार्च रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारांना आपला आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता.
आता, UGC NET परीक्षेची आता अंतिम Answer Key जारी करण्यात आली आहे.
अशी डाउनलोड करा Answer Key
> UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या.
> होमपेजवर, 'UGC – NET DECEMBER 2022 – फायनल प्रोव्हिजनल Answer Key' या लिंकवर क्लिक करा.
> UGC NET अंतिम Answer Key PDF स्क्रीनवर उघडेल.
> ते तपासा आणि पुढील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
या वर्षी 8,34,537 उमेदवारांनी UGC NET साठी परीक्षा दिली आहे. आता उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा आहे. NTA ने अंतिम Answer Key जारी केली आहे. UGC NET निकालाची लिंक देखील लवकरच अॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना अधिक माहिती NTA nta.ac.in आणि UGC NET वेबसाइट ugcnet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI