(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NEET-PG समुपदेशनात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; म्हणाले, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालू शकत नाही
NEET-PG Counselling : सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, ते NEET-PG 2022 समुपदेशनात हस्तक्षेप करणार नाही
NEET-PG Counselling : सर्वोच्च न्यायालयाने NEET-PG 2022 समुपदेशनात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, ते NEET-PG 2022 समुपदेशनात हस्तक्षेप करणार नाही किंवा थांबवणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका वकिलाने NEET-PG 2022 शी संबंधित याचिकेचा उल्लेख केल्यावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आली.
SC ने NEET-PG समुपदेशनात हस्तक्षेप करण्यास नकार दिला
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हेमा कोहली यांच्या खंडपीठाने एनईईटी पीजीशी संबंधित प्रकरणाचा संदर्भ देताना एका वकिलाने स्पष्टीकरण मागितले, तेव्हा तोंडी टिप्पणी केली. NEET-PG 2022 समुपदेशन 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी खंडपीठाने सांगितले की, आम्ही NEET-PG 2022 समुपदेशनात हस्तक्षेप करणार नाही. NEET PG समुपदेशन चालू द्या आणि ते थांबवू नका, कारण आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालू शकत नाही. याआधी 8 ऑगस्टलाही सर्वोच्च न्यायालयाने समुपदेशनाला स्थगिती देणार नसल्याचे सांगितले होते. यावेळी अशा निर्णयाचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले होते.
काय होती याचिकाकर्त्यांची मागणी?
याचिकाकर्त्यांनी एनईईटी पीजी निकाल 2022 मध्ये विसंगती असण्याची शक्यता व्यक्त करून एनबीईकडून स्पष्टीकरणाची मागणी केली होती. याचिकेत उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन (NBE) ने यावेळी आंसर की आणि प्रश्नपत्रिका जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. NEET PG समुपदेशन 1 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे आणि या तारखेपूर्वी सुनावणीसाठी अपील करण्यात आले होते, परंतु न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
NEET UG 2022 Answer Key : आक्षेप कसा नोंदवावा?
1. सर्वात आधी उमेदवारांनी nta.nic.in या NEET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2. त्यानंतर उमेदवारांनी उत्तरपत्रिका या लिंकवर क्लिक करावं.
3. त्यानंतर उमेदवारांनी लॉगिन तपशील टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावं.
4. आता उमेदवारांनी कोणत्या प्रश्नासाठी आक्षेप घ्यायचा आहे ते निवडावं.
5. शेवटी उमेदवारांनी आक्षेप शुल्क भरून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावं.
इतर महत्वाच्या बातम्या
Lalbaugcha Raja : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाच्या मूर्तीची आज पहिली झलक, लाडक्या बाप्पाचे दर्शन होणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI