शाळा सुरू होवून तीन महिने झाले तरी गणवेश नाही, विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्यांचा उपहासात्मक सत्कार
Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास कल्याण डोंबिवलकरांना सहन करावा लागत असताना आता यातून पालिका शाळांमधील विद्यार्थी देखील सुटलेले नाहीत.
मुंबई : शाळा (Schools) सुरू होवून तीन महिने झाले, मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना (Students) गणवेशाचे वाटप झाले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या (Shiv Sena) माजी नगरसेवकासह कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या (Kalyan Dombivli Municipal Corporation) शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळ कार्यालयात जाऊन गणवेश देण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत उपहासात्मक सत्कार केला आणि लवकरात लवकर गणवेश देण्यात यावे अशी मागणी केली.
"शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, पण पुस्तकं नाही, गणवेश नाही, आम्हाला देखील सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे अशी मागणी करत, विद्यार्थी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलाश शिंदे यांनी आज पत्रिपुलापसून शिक्षण मंडळ कार्यालय पायी चालत गाठले. याबरोबरच भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देत आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे आणि तातडीने मुलांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप करावे अशी मागणी केली.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास कल्याण डोंबिवलकरांना सहन करावा लागत असताना आता यातून पालिका शाळांमधील विद्यार्थी देखील सुटलेले नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 60 शाळा असून या शाळांमध्ये गोर गरीब गरजू असे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पालिका शाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून अद्यापही शालेय गणवेशासह अन्य शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप केले नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेशांशिवाय किंवा जुने गणवेश घालत शाळेत जाण्याची नामुष्की ओढवली आहे.
याबाबत अनेकदा तक्रारी निवेदने देवून ही काहीच कार्यवाही झाली नसल्याने पालकवर्गात संताप आहे. आज शिक्षण विभागाच्या अनागोंदी कामकाजाचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक कैलाश शिंदे यांच्यासह पालिका शाळा मधील विद्यार्थ्यांनी कल्याण पूर्व पत्रिपुलापसून पायी चालत कल्याण पश्चिम सहजानंद चौक येथील शिक्षण मंडळ कार्यालय गाठलं. शिक्षण मंडळाकडे तत्काळ गणवेश व शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप करा अशी मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देत उपहासात्मक सत्कार केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. आर्थिक दुर्बल घटकातील तसेच वंचित घटकातील विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुले आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे आणि तातडीने मुलांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI