SSC Exam 2023 Schedule : एसएससी सीजीएल, सीएचएसएल, जेई या परीक्षांच्या तारखा जाहीर; 'असे' डाऊनलोड करा कॅलेंडर
SSC Exam 2023 Schedule : SSC ने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षांसाठी एसएससीने कॅलेंडर जारी केले आहे.
SSC Exam 2023 Schedule : 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने SSC CGL, SSC CHSL, SSC LE यांसह विविध परीक्षांसाठी परीक्षेचं कॅलेंडर जारी केलं आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणारे उमेदवार ssc.nic.in येथे आयोगाच्या (SSC) या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन परीक्षा कॅलेंडर तपासू आणि डाऊनलोड करू शकतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षांसाठी एसएससीने कॅलेंडर जारी केले आहे.
SSC परीक्षा कॅलेंडरनुसार, एकत्रित पदवीधर स्तर परीक्षा (SSC CGL) 2023 (टियर-2) 25, 26 आणि 27 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा (SSC CHSL) 2023 (टियर-2) परीक्षा 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. SSC कनिष्ठ अभियंता किंवा SSC JE (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्रमाण सर्वेक्षण आणि करार) परीक्षा, 2023 (पेपर-2) 4 डिसेंबर रोजी आणि दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये उपनिरीक्षक (SSC CPO SI) साठी परीक्षा , 2023 (टियर 2) 22 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.
SSC भरती परीक्षा 2023 च्या तारखा खालीलप्रमाणे आहेत
'असे' डाऊनलोड करा कॅलेंडर
- सर्वात आधी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला ओपन करा.
- तुमच्यासमोर मुखपृष्ठ ओपन होईल. आता 'Important notice : Exam Timetable' या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर परीक्षेच्या तारखा असलेली PDF ओपन करा.
- एसएससी कॅलेंडर 2023 डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.
प्रवेशपत्र अनिवार्य
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत परीक्षेचं प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 ते 15 दिवस आधी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी हे अॅडमिट कार्ड आपल्या बरोबर परीक्षेला नेणं बंधनकारक आहे. अन्यथा उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, प्रवेशपत्रासोबत आधार कार्डची फोटोकॉपी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत नेण्यास विसरू नका.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI