Nashik News : नाशिकच्या मुक्त विद्यापीठात बीए, बीकॉमसाठी शैक्षणिक शुल्क वाढलं, लाखो विद्यार्थ्यांना फटका
Nashik News : नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं (YCMOU) यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे.
नाशिक : नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं (YCMOU) यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात (Education Fee) भरमसाठ वाढ केल्याचे समोर आले आहे. विद्यापीठानं बी. ए. आणि बी.कॉम. प्रथम वर्षाच्या शैक्षणिक शुल्क 1 हजार 702 वरून थेट 2 हजार 988 रूपये केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या (Open University) या धोरणामुळे राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक भुर्दंडाचा बोजा पडला असून शिवाय त्यांचं शिक्षणच धोक्यात आले आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नाशिकचे (Nashik) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कार्यान्वित आहे. दरवर्षीं लाखो विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. मात्र ज्ञानगंगा घरोघरी ब्रीद घेऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचू पाहणाऱ्या या विद्यापीठाने या शिक्षणाच्या गंगेचा प्रवाह, खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाकडून वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची 75 ते 80 टक्के फी वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या बीकॉम (B Com) आणि बीए या दोन अभ्यासक्रमाला जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे राज्यातल्या अडीच ते 3 लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. त्या दोन्ही अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षी बीए आणि बीकॉम फर्स्ट इयरला ऍडमिशन (Admission Fee) करायचं असेल तर 1702 रुपये ऍडमिशन शुल्क होतं. यावर्षी मात्र 2988 विद्यार्थ्यांना मोजावे लागत आहे. फक्त ही याच दोन अभ्यासक्रमाची स्थिती नाही तर विद्यापीठाच्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ 75 टक्के असून याशिवाय बी. एस.सी. 55 टक्के, डी.सी.एम 35 टक्के आणि एम.ए. साठी 36 टक्के शैक्षणिक शुल्क वाढवण्यात आली आहे. इतर बीएससी, एमए, बीएसस्सी किंवा अशा अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 35 ते 55 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. एवढी मोठी शैक्षणिक शुल्कात वाढ झालेली असताना कोणत्याही विद्यार्थी संघटनेने, राजकीय पक्ष याच्यावर काही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे यावर्षीच्या आधी जी शैक्षणिक शुल्क भरण्याची मुभा होती, ती दोन टप्प्यांमध्ये होती. मात्र आता पहिल्यांदाच एकाच वेळी म्हणजेच ज्यावेळी विद्यार्थी ऍडमिशन घेतील, त्याचवेळी हे संपूर्ण फी भरण्याची सक्ती विद्यापीठाने केलेली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी
राज्यातील विद्यार्थी आहेत, जे शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून वंचित होते, त्यांना शिक्षण आधी घेता आलं नाही. त्यांना शिक्षणाची व्यवस्था व्हावी, म्हणून एक जुलै 1989 रोजी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आत्तापर्यंत जवळपास 75 लाख विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून वेगवगेळ्या पदव्या घेतलेल्या आहेत. मागील वर्षी जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी झाली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास 1000 कोटींच्या ठेवी विद्यापिठाच्या वेगवेगळ्या हेडखाली ठेवण्यात आल्या आहेत. असं असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. हे सर्व निर्णय जे आहे ते, या महाराष्ट्रातल्या या विद्यापीठामार्फत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पाच वर्षात पहिल्यांदाच वाढ
मागील पाच वर्षात पहिल्यांदाच वाढ करण्यात आली असून अभ्यासक्रमानुसार फी भरण्याचे टप्पे ठरविण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. इतर विद्यापीठांमध्ये शैक्षणिक शुल्क मुक्त विद्यापीठाच्या अधिक आहे. त्यामुळे पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत वायसीएममध्ये झालेली वाढ कमीच आहे. ही वाढ आता नाहीतर हे अकॅडमिक वर्ष सुरु होण्यापूर्वी झाली असून निवडक अभ्यासक्रमांसाठी असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :
Nashik : गरीब विद्यार्थ्यांनी शिकायचं तरी कसं? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शुल्कात मोठी वाढ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI