NEET Success Story : भाजी विक्रेत्याच्या मुलीचं घवघवीत यश, पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण; कोणत्याही शिकवणीशिवाय मिळवले 617 गुण
Solapur NEET Success Story : सोलापुरातल्या संजय गांधी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या मुलीने घवघवीत यश संपादन केलं आहे. अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवले आहेत.
सोलापूर : वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result) नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये सोलापुरातल्या संजय गांधी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या मुलीने घवघवीत यश संपादन केलं आहे. अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे यासाठी तिने कोणतेही क्लासेस किंवा ट्युशन लावलेले नाहीत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीअसताना अल्फीयाने मिळवलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीचं घवघवीत यश
सोलापुरातल्या संजय गांधी नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या पठाण कुटुंबियांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले आहेत. त्याला कारण म्हणजे अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ना कोणते क्लासेस, ना कोणती ट्युशन. कुटुंबात कोणीही उच्च शिक्षित नाही. वस्तीत असलेल्या यशोधरा कॉलेजच्या शिक्षकांनीही मेहनत घेतली. या सर्वांच्या मेहनतीमुळेच झोपडपट्टीतील पहिली डॉक्टर होण्याचे अल्फीयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
कोणत्याही शिकवणीशिवाय नीट परीक्षेत यश
अल्फीयाचे वडील मुस्तफा पठाण हे भाजी विक्रीचे काम करतात तर, आई समिना या एका कपड्याच्या दुकानात कामाला जातात. दोघेही अल्पशिक्षित, मात्र आपली मुलगी डॉक्टर व्हावी, म्हणून दोघांनीही कठोर परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही तिचे शिक्षण थांबवले नाही आणि म्हणूनच अल्फीयाने यशाला गवसणी घातली आहे.
कोणत्याही शिकवणीशिवाय 720 पैकी 617 गुण
अल्पसंख्यांक समाजात उच्च शिक्षणाचे प्रमाण हे कमी आहे. त्यात नशिबी आलेली गरिबी मुलांच्या शिक्षणात अडथळा ठरू नये, यासाठी मुस्तफा आणि समीना पठाण यांनी केलेले कष्ट नक्कीच कौतुकास्पद आहेत. प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेत अल्फीया पठाणने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. अल्फीयाचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे, तिच्या पुढील शिक्षणासाठी एबीपी माझाकडूनही शुभेच्छा.
महत्त्वाच्या इतर बातम्या
NEET Success Story: शेतात सहा तास काम...युट्युबच्या मदतीने अभ्यास; शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर, पहिल्याच प्रयत्नात NEET उत्तीर्ण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI