एक्स्प्लोर

NEET-PG Exam 2025 : मोठी बातमी : NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश, जाणून घ्या सविस्तर

NEET-PG Exam 2025 : नीट पीजी 2025 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे.

NEET-PG Exam 2025 : नीट पीजी 2025 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, परीक्षा एकाच सत्रात घेण्यात यावी, जेणेकरून पारदर्शकता टिकेल आणि सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध होईल. नीट पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, त्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ती मागणी फेटाळून लावत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयानंतर नीट पीजी 2025 ची परीक्षा 15 जून रोजी देशभरात एकाच सत्रात पार पडणार आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेच्या स्तरात भिन्नता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे असमानता आणि मनमानीची शक्यता वाढते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका अचूकपणे एकसमान कठीणतेच्या असतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी समान निकष आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

परीक्षा दोन सत्रांमध्ये होण्याच्या चर्चांना पूर्णविराम 

दरम्यान, 15 जून रोजी होणाऱ्या NEET-PG 2025 परीक्षेसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी अजूनही वेळ उपलब्ध आहे, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळाकडे पुरेसा वेळ आहे, असेही कोर्टाने नमूद केले. त्यामुळे परीक्षा दोन सत्रांमध्ये होण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

2 जूनला मिळणार एक्झाम सिटी स्लिप 

NEET PG परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी स्लिप 2 जून 2025 रोजी मिळणार आहे. ही सिटी स्लिप अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली जाणार नाही. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळ (NBEMS) उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर सिटी स्लिप पाठवणार आहे. उमेदवारांनी ती स्लिप तिथून डाऊनलोड करून घ्यावी.

परीक्षेच्या चार दिवस आधी मिळणार अॅडमिट कार्ड 

परीक्षेच्या चार दिवस आधी NEET PG 2025 चे अ‍ॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर उपलब्ध करून दिले जाईल. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. हॉल तिकीटाशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आणखी वाचा

UPSC Website Changed : पूजा खेडकरसारख्या प्रकरणांना बसणार चाप, UPSC ची वेबसाइट बदलली, आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Potholes on Road: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
World Cup Points Table : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu On BJP: 'गरज सरो अन् वैद्य मरो', BJP च्या धोरणांवर बच्चू कडू संतापले
Election Comminssion : मविआ-मनसे एकत्र, निवडणूक आयोगाच्या भेटीला
High Court On Pothole Menace: खड्डे किंवा मॅनहोलमुळे मृत्यू? ६ लाखांची भरपाई द्या: हायकोर्ट
Satara Crime: साताऱ्यात अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, परिसरात संतापाची लाट.
MNS Meeting: युतीबद्दल भूमिका मांडू शकता, मनसे प्रवक्त्यांना सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Potholes on Road: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखांची नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचा सरकारला आदेश
World Cup Points Table : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
Hardik Pandyas Girlfriend Mahieka Sharma: हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड महिका शर्माकडे गूड न्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली...
हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड महिका शर्माकडे गूड न्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली...
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
Embed widget