(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NEET UG 2022 Admit Card : NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'या' ठिकाणी करा डाउनलोड
NEET UG 2022 Admit Card : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
NEET UG 2022 Admit Card : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत साइट neet.nta.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेसाठी आधीच सिटी इंटिमेशन स्लिप जारी केल्या होत्या. अधिकृत साइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता, कसं ते वाचा
देशभरातील 546 शहरांमध्ये परीक्षा
नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही परीक्षा 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. ज्यासाठी सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. हे सर्व उमेदवार परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. एनटीएने जारी केलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, परीक्षा रोल नंबर, जन्मतारीख, पूर्ण नाव इत्यादी तपशील दिले आहेत. ही परीक्षा देशभरातील 546 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा (NEET परीक्षा) दुपारी 02:00 वाजता सुरू होईल आणि 05:20 वाजता संपेल. यासाठी परीक्षेसाठी उमेदवार थेट neet.nta.nic.in लिंकद्वारे प्रवेशपत्र पाहू शकतील. ते डाउनलोड करण्यासाठी त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरावे लागेल. प्रवेशपत्राच्या हार्डकॉपीशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही.
प्रवेशपत्र 'असं' डाउनलोड करा
-अधिकृत वेबसाइटला भेट द्या - neet.nta.nic.in.
-त्यानंतर NEET-UG 2022 अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
-तुमचा अर्ज क्रमांक किंवा इतर आवश्यक तपशीलांसह लॉग इन करा.
-अॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि प्रिंट आउट काढा.
परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल
नीट परीक्षा 91,415 मेडिकल, 26,949 डेंटल, 52,720 आयुष आणि 603 पशुवैद्यकीय जागांसाठी घेतली जाणार आहे. ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. बीएससी नर्सिंग आणि लाइफ सायन्स अभ्यासक्रमांसाठीही नीट (NEET) स्कोअरचा उपयोग होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Mission Admission : शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता
CBSE Result 2022 : 'या' तारखेला जाहीर होऊ शकतो CBSE 10वी-12वीचा निकाल, नवीन अपडेट जाणून घ्या
JEE Main Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI