एक्स्प्लोर

Mumbai University: मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, 304 अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद, नेमकं कारण काय? विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

Mumbai University: मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांमधील जुन्या अभ्यासक्रमांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Mumbai University: मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) संलग्न महाविद्यालयांमधील जुन्या अभ्यासक्रमांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन ते तीन शैक्षणिक वर्षांपासून ज्या अभ्यासक्रमांना एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालेली नाही, तसेच जे अभ्यासक्रम बंद होऊन दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा एकूण 304 अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Mumbai University: शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा बंद

विद्यापीठाच्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन वर्षांत कोणतीही विद्यार्थी नोंदणी न झालेल्या 125 अभ्यासक्रमांच्या परीक्षा निष्क्रिय घोषित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी अभावामुळे या परीक्षा यापुढे नियमितपणे घेतल्या जाणार नाहीत.
या 125 परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या 23 परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या 15 परीक्षा, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या 42 परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 45 परीक्षांचा समावेश आहे.

Mumbai University: नोंदणी आल्यास परीक्षा पुन्हा सुरू होणार

शून्य नोंदणीमुळे बंद करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांबाबत एक महत्त्वाची अट विद्यापीठाने स्पष्ट केली आहे. भविष्यात जर कोणत्याही संलग्न महाविद्यालय किंवा संस्थेकडून या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी नोंदणीचा अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाला, तर फक्त त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जातील. अशा परिस्थितीत परीक्षा कार्यक्रम जाहीर करणे, प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षक नियुक्ती आणि इतर सर्व परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमांनुसार पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai University: 10 वर्षे पूर्ण झालेल्या 179 परीक्षा कायमस्वरूपी बंद

दरम्यान, अभ्यासक्रम बंद होऊन दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत विद्यापीठाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा 179 अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जाणार नाहीत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. या कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 10 परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या ८६ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या 38 परीक्षा, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या 45 परीक्षा
यांचा समावेश आहे.

Mumbai University: जुने अभ्यासक्रम, बदलती शैक्षणिक गरज

मुंबई विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम कालांतराने विद्यार्थी संख्येअभावी बंद पडले, तर काही अभ्यासक्रमांचे स्वरूप बदलले. आतापर्यंत अशा अभ्यासक्रमांमध्ये पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र आता दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करून परीक्षा यंत्रणा अधिक सुसूत्र व अद्ययावत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे स्पष्ट होते. या निर्णयामुळे परीक्षा व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार असून, चालू आणि मागणी असलेल्या अभ्यासक्रमांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे मत आहे.

आणखी वाचा 

मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई, लाच घेताना अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्कला अटक, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget