महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर 15 दिवसात ABC Id कार्डची नोंदणी करावी; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचं विद्यार्थ्यांना आवाहन
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा एबीसी आयडी नवीन शैक्षणिक धोरणाच्या श्रेयांक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांनी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC Id) ची नोंदणी करणे आवश्यक आहे.
Mumbai University ABC Id : मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 चे प्रवेश सुरू आहेत. या शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत आहे यासाठी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजे एबीसी आयडी (ABC Id) महत्वाचा आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा एबीसी आयडी प्रवेशानंतर 15 दिवसात काढावा असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या श्रेयांक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांनी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) ची नोदणी करणे आवश्यक आहे. एबीसी आयडी तयार करताना विद्यार्थ्याचा भ्रमणध्वनी आधारशी जोडला नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना एबीसी आयडी तयार करताना अडचणी येत आहेत असे विद्यापीठास दिसून आले आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांनी प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी तयार करून सदर अचूक डेटा विद्यापीठास सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
Mumbai University ABC Id : एबीसी आयडी कसा काढावा?
विद्यार्थ्यांनी www.abc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
1. विद्यार्थ्यांनी त्यावरील माय अकाउंटवर क्लिक करावं.- Click on myaccount->students
2. नवीन यूजर असेल तर मेरी पेहचान यावर साईन अप करावं.- For new users -Click on "sign up for Meri Pahachan "
3. त्यावर मोबाईल नंबर टाकावा आणि नंतर त्यावर एक ओटीपी येईल. - Enter mobile number, You will get OTP on your registered mobile number
4. आवश्यक त्या नोंदी भराव्यात आणि व्हेरिफाय बटनावर क्लिक करावं.- Fill all necessary details and click on verify
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे एबीसी कार्ड मिळेल.
Mumbai University ABC Id : एबीसी आयडी कसा काढावा?
1. डिजिलॉकरला भेट द्या.- Sign in to digilocker by visiting on www.digilocker.gov.in
2. त्यामध्ये डॉक्युमेंट्स सर्च करा.- Go to Search Documents
3. शिक्षण सेक्शनमध्ये जा.- Go to Education Section
4. त्यामध्ये एबीसी आयडी विजेट सर्च करा.- Search for ABC ID widget
5. त्यानंतर एबीसी आयडी डाऊनलोड करा.- Click on widget to generate and download ABC ID
6. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे एबीसी आयडी कार्ड मिळेल.- Students will get the ABC ID
ही बातमी वाचा :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI