MSBOS Open School Results 2022 : महाराष्ट्र ओपन स्कूल रिजल्ट जाहीर, कसा पाहाल?
Maharashtra Open School Result 2022 : 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र मुक्त शाळेचा निकाल जाहीर झाला आहे.
Maharashtra Open School Result 2022 : महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा मंडळानं महाराष्ट्र मुक्त शाळा निकाल 2022 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार MSBOS च्या अधिकृत वेबसाइट msbos.mh-ssc.ac.in किंवा msos.ac.in वरून निकाल डाउनलोड करू शकतात.
30 डिसेंबर 2021 ते 8 जानेवारी 2022 दरम्यान इयत्ता 5वी आणि 8वी साठी महाराष्ट्र मुक्त शाळा परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि अमरावती या सहाही विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. 5वी, 8वी मुक्त शाळा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फक्त स्कोअर कार्ड दिले जातील. अंतिम उत्तीर्ण प्रमाणपत्र पुढील काही दिवसांत देण्यात येईल. MSBOS अशा विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी सुरू करण्यात आले होते. ज्यांना शाळा सोडावी लागली आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्यांच्या स्थापनेदरम्यान, MSBOS इयत्ता 10 आणि 12 च्या परीक्षा देखील घेतील, असं म्हटलं होतं. तर सध्या MSBOS मध्ये फक्त 5वी आणि 8वीचा वर्ग समाविष्ट आहे.
20 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र मुक्त शाळेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विषयनिहाय निकाल विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थी वर नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांच्या स्कोअरकार्डचे प्रिंटआउट देखील घेऊ शकणार आहेत.
तुमचा निकाल पाहण्यासाठी खालील प्रक्रिया जाणून घ्या
- निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम MSBOS च्या अधिकृत वेबसाइट www.msos.ac.in ला भेट द्या.
त्यानंतर होमपेजवरील लिंकवर क्लिक करा
लॉगिन करण्यासाठी तुमची माहिती द्या
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 11th Admission Process : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या तारखा
- U.S.Forgives Student Loans : यूएसने 40,000 विद्यार्थ्यांचे कर्ज माफ केले, आणखी 3.6 दशलक्ष नागरिकांना दिली मदत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI