MPSC MO Recruitment 2022: राज्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करण्याची 'ही' शेवटची तारीख, आजच करा अर्ज
MPSC MO Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच 17 ऑगस्ट 2022 आहे. कसा कराल अर्ज?
MPSC MO Recruitment 2022 : महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकारी (MPSC Medical Officer Recruitmrnt 2022) च्या 400 हून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ज्या उमेदवारांना MPSC (Maharashtra Medical Officer Recruitmrnt 2022) या पदांसाठी अर्ज करायचा आहे, आणि काही कारणास्तव अद्याप अर्ज करता आला नाही, त्यांनी आजच अर्ज करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय अधिकारी (Maharashtra Government Job) च्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच 17 ऑगस्ट 2022, बुधवार आहे. कसा कराल अर्ज? जाणून घ्या
'या' वेबसाइटवरून करा अर्ज
MPSC (Maharashtra MPSC Medical Officer Recruitment 2022) च्या पदांवरील अर्ज फक्त ऑनलाइन करता येतील. यासाठी उमेदवारांनी mpsconline.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. त्याच वेळी, या पोस्ट्सबद्दल तपशील मिळविण्यासाठी, या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - mpsc.gov.in.
अनेक पदांवर भरती होणार
या भरती प्रक्रियेद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण 427 पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी आहेत. या रिक्त जागा जाहिरात क्रमांक 70/2022 अंतर्गत आल्या आहेत.
अर्जासाठी कोण आहे पात्र?
एमपीएससी वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस केलेले असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 18 वरून 38 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच उमेदवाराने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
एक लाखापेक्षा जास्त असेल पगार
जर तुमची या पदांवर निवड झाली, तर तुम्हाला नियमानुसार 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. दुसरीकडे, जर आपण अर्ज फी बद्दल बोललो, तर सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्जाची फी 394 रुपये आणि आरक्षित श्रेणीसाठी 294 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मुलाखतीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
संबंधित बातम्या
Marathwada: मराठवाड्यातील अंगणवाड्या 'लय भारी'; गतवर्षाच्या तुलनेत 13 हजार विद्यार्थी वाढले
NEET PG 2022 : NEET PG समुपदेशनाची तारीख जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक
कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी
NEET UG Registration 2022 : NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ, 10 लाखांहून अधिक महिला उमेदवारांची नोंदणी
NEET PG समुपदेशनासाठी ही' आहेत आवश्यक कागदपत्रे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI