Nagpur News : रस्त्यांची कामे ठरताय डोकेदुखी, वाहतूक कोंडीचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना
Nagpur News : नागपूर शहरात सध्या मोठ्याप्रमाणात सुरू असलेले रस्ते, पुलांच्या बांधकामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहे. या वाहतूककोंडीचा फटका विद्यार्थ्यांना देखील बसत आहे.
Nagpur News : नागपूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले रस्ते, पुलांच्या बांधकामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर (Nagpur News) त्रस्त झाले आहे. या वाहतूककोंडीचा मोठा फटका विद्यार्थ्यांना देखील बसत आहे. आज, 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. नागपूर (Nagpur) विभागातील सहा जिल्ह्यांतील एकूण 1 लाख 63 हजार 17 विद्यार्थी या परीक्षेसाठी सज्ज आहेत, तर नागपूर विभागात 83 हजार 764 विद्यार्थी आणि 79 हजार 252 विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. शरारातील शेकडो रस्ते आणि पुलांचे निर्वाधिन कार्य आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ही संभाव्य समस्या टाळण्यासाठी घरातून लवकर निघण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र आहे.
विद्यार्थांना बसतोय वाहतूककोंडीचा फटका
राज्यात बुधवारपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नागपूर शहरातील 85 परीक्षा केंद्र सज्ज झाली आहते. मात्र, या परीक्षा केंद्र वेळेत गाठणे, हे एक मोठे आव्हान ठरत आहे. कारण, शहरातील बहुतांश भागातील प्रमुख रास्ते आणि पुलांच्या बांधकामांमुळे दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. कधी-कधी, अर्धा-अर्धा तास वाहतूककोंडी निघत नसल्याने वाहनचालक प्रचंड वैतागले आहेत. या समस्येचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बारावीची परीक्षा दोन सत्रांत होणार होणार असून सकाळी 11 आणि दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. सकाळच्या सत्रात 10.30 वाजता आणि दुपारच्या सत्रात दुपारी अडीच वाजता विद्यार्थ्यांना उपस्थित राहावं लागणार आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाच्या परीक्षेतही निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येणार आहे.
'ही' आहेत शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे
अशोक चौक ते अग्रसेन चौका, अजनी पूल, सोमलवाडा चौक ते मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग, न्यू स्नेह नगर, खमाला रोड मालविया नगर चौक, गुलमोहर हॉल ते वर्धा रोड, बोले पेट्रोल पंपापासून ते रविनगर, देव नगर, स्वावलंबी नगर रोड, पडोळे चौक ते ऑरेंज सिटी रोड, इंद्रप्रस्थ लेआउट ते शिवानंद अपार्टमेंट स्वावलंबी नगर, नीरी रोड ते आठ रास्ता चौक, देव नगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक (वर्धा रोड) ते गजानन नगर, पन्नासे लेआउट बस स्टॉप, ते डेटा नगर गणेश किराणा स्टोअर, हॅम्पयार्ड रोड ते लोकमत स्क्वेअर, बलराज मार्ग सोसायटी ते दीनानाथ स्कूल आरडी-8, खरे मार्ग, धंतोली, आनंद टॉकीज ते धंतोली पोलीस स्टेशन (पुलापर्यंत), लक्ष्मीनगर झोन ऑफिस ते रुतुपर्णा अपार्टमेंट (रचना एन्क्लेव्ह), गांधीनगर चौक ते अभ्यंकर चौक ते श्रद्धानंद पेठ चौक (सर विश्वेश्वरय्या चौक), रामनगर बाजीप्रभू चौक ते लक्ष्मी भवन चौक ते ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, धरमपेठ झेंडा चौक ते आदिवासी विकास भवन, भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोड, हसनबाग चौक ते गाडगेनगर रमणा मारोती ते गजानन मंदिर, दहीबाजार ओव्हरब्रिज ते ऑटोमोटिव्ह चौक, प्रताप नगर चौक ते ऑरेंज स्ट्रीट रोड (सोमलवार हायस्कूल रोड), मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पवनभूमी मेन रोड आणि महादेव मंदिर रोड ही शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI