एक्स्प्लोर

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल 27 म्हणजे उद्या जाहीर होणार आहे. 16 लाख विद्यार्थी अन् लाखो पालकांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) वतीनं दहावीच्या परीक्षेचा (Maharashtra SSC Exam Result 2024) निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. हा निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती दिली जाईल. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांची निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
  
बारावीचा निकाल ज्या प्रमाणं ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला त्याच प्रकारे दहावीचा निकाल देखील जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाल खालील वेबसाईटवर 27 मे रोजी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.  विद्यार्थी या वेबसाईटना भेट देऊन त्यांची वर्षभरातील कामगिरी कशी राहिली हे निकालाच्या माध्यमातून पाहू शकतात.

दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी  

1. https://mahresult.nic.in

2. http://sscresult.mkcl.org  

3. https://sscresult.mahahsscboard.in

4. https://results.digilocker.gov.in

5. https://results.targetpublications.org

दहावीचा निकाल कसा पाहणार? 

स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 

स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा.

स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. 

स्टेप 5: निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या. 

दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं.  मार्च २०२४ मध्ये  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची परीक्षा पार पडली होती. आता निकाल जाहीर होण्यास काही तासांचा कालावधी राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे.

दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावी प्रवेशाला गती

राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यातील नोंदणीला 24 मे रोजी सुरुवात झाली आहे. आता दहावीचा निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर या प्रक्रिेयेला गती मिळेल. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं केंद्रीय प्रवेश प्रक्रिेयद्वारे राबवली जाते.
  
 संबंधित बातम्या :

Maharashtra SSC Result 2024 : विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत...

Maharashtra SSC Result 2024 Live: 16 लाख विद्यार्थी अन् लाखो पालकांसाठी महत्त्वाचा दिवस, दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Om Birla Elected as Speaker : आवाजी पद्धतीने मतदानात ओम बिर्लांचा विजयABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीकाRahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Karan Johar Koffee With Karan : करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
Embed widget