Maharashtra School: राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी, नवीन शैक्षणिक वर्ष 12 जूनपासून होणार सुरू
Maharashtra School : विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 26 जून पासून सुरु होणार आहे. शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मुंबई: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांना (Maharashtra School Summer Vacation) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 11 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक (Maharashtra School New Academic Year) वर्ष 12 जूनपासून सुरु होणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 26 जून पासून सुरु होणार आहे. शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या पत्रकात दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. 2 मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही 11 जून पर्यंत असणार आहे. तर राज्यभरातील नव शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून म्हणजेच 12 जून पासून सुरू केले जाणार आहे. तर विदर्भातील उन्हाळा लक्षात घेता त्या भागातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या चौथ्या सोमवार पासून म्हणजेच 26 जून पासून सुरू होणार आहे.
इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. हा निकाल संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शाळांची असणार आहे. शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असं सुद्धा परिपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.
स्कूल बस शुल्कात वाढ करण्याचा निर्णय
आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात (School Bus Fees) मोठी वाढ होणार आहे. स्कूल बस असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला असून 15 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. मागील वर्षी वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बस (School Bus) शुल्कात वाढ केली होती. आत, पु्न्हा एकदा 1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI