Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: राज्यातील बारावीचा निकाल जाहीर होणार; बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?, जाणून घ्या
Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahresult.nic.in निकाल पाहता येणार आहे.
LIVE
Background
Maharashtra HSC Result 2024 LIVE Updates: पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.
निकाल जाहीर होताच वेबसाईट बंद
पुणे: बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. मात्र बोर्डाने दिलेली mahresult.nic.in ही वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली. विद्यार्थी आणि पालकांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर अक्षरश: उड्या घेतल्या. मात्र ही वेबसाईटच ओपन होत नसल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली.
यंदाही कोकण विभाग अव्वल तर मुंबई विभाग तळाशी
Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभाग अव्वल तर मुंबई विभाग तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के? https://t.co/qiNxqhtWcK #hsc2024 #hscresult #maharashtra
— ABP माझा (@abpmajhatv) May 21, 2024
Maharashtra HSC Result 2024: बारावीत यंदाही मुलींची बाजी
#HSCResult2024 पोरींनो जिंकलंत...! बारावीत यंदाही मुलींची बाजी, राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के #12thexamresult https://t.co/uHTCt5PTbZ
— ABP माझा (@abpmajhatv) May 21, 2024
Maharashtra HSC Result 2024: पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्के
Pune HSC Result : बारावीचा निकाल जाहीर , पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्केhttps://t.co/rryv1c9fNZ #punehscresult
— ABP माझा (@abpmajhatv) May 21, 2024
Maharashtra HSC Result 2024: बारावीच्या निकालात कोकणाची सरशी
HSC Result 2024 : इयत्ता बारावीच्या निकालात कोकणाची सरशी; मराठवाड्यातील लातूर, संभाजीनगर विभागाचा निकाल काय?https://t.co/hxOUXT8MqY#hsc2024 #HSCResult #HSCResult2024 #HSC2024 #MaharashtraHSCResult
— ABP माझा (@abpmajhatv) May 21, 2024