Maharashtra HSC Result 2023 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
Mahrashtra HSC Result 2023 : बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजल्यानंतर बोर्डाच्या वेबसाईट ऑनलाईन पाहता येईलच. शिवाय यंदा 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे.
Mahrashtra HSC Results 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) उद्या जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजल्यानंतर बोर्डाच्या वेबसाईट ऑनलाईन पाहता येईलच. शिवाय यंदा 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
कुठे पाहाल बारावीचा निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, मंगळवारी 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
कसा पाहाल निकाल?
स्टेप 1 - https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3- तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर त्यासाठी 26 मे ते 5 जून पर्यंत मुदत असेल. या परीक्षेतील उत्तर पत्रिकांचा झेरॉक्स कॉपी ज्या विद्यार्थ्यांना हव्या असतील त्यांना 26 मे ते 14 जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी देखील ऑनलाईन शुल्क जमा करावे लागतील.
14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.
संबंधित बातमी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI