कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ; चंद्रकांत पाटलांची घोषणा
Chandrakant Patil : कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
मुंबई : कोरोनामुळे (Corona) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकंचे निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण (Education) पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
"कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे फार मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे फार मोठा दिलासा मिळेल.#Maharashtra #MonsoonSession pic.twitter.com/kvUjCvls9I
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 22, 2022
"चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कोरोनामुळे ज्यांनी आई-वडील दोघांनाही गमावले आहे अशा विद्यार्थ्यांची चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांची फी ही राज्य सरकारतर्फे भरण्यात येईल. यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही. #Maharashtra #MonsoonSession pic.twitter.com/1Mz2d969D0
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 22, 2022
कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहे. अशा अनेक अनाथ मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी सरकार भरणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Reservation to Govindas : गोविंदांना अधिकचं आरक्षण दिलं नाही, फक्त एक खेळ जोडला : चंद्रकांत पाटील
MPSC आणि B. Ed CET परीक्षा एकत्र देणाऱ्यांसाठी 'हा' पर्याय, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी होते संभ्रमात
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI