Board Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, दहावी-बारावीचा निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड
Board Exam : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई : दहावी-बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आता निकालाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. निकालासंदर्भात पुढच्या आठवड्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगरमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात वर्षा गायकवड बोलत होत्या.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, दहावीची आणि बारावीचे निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मार्चमध्ये एक बैठकमध्ये झाली आहे. पुढच्या आठवड्यातही एक बैठक होणार आहे. साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतात यावर्षी ही निकाल वेळेत लागणार आहेत.
दरम्यान राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणावरून शाळा परिसरातील भोंग्याबाबत काही निर्णय होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना शाळा सुरू झाल्यानंतर त्यावर बोलू असं त्या म्हणाल्या. सोबतच नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली त्यांनी शांतीचा संदेश दिला, देशात एकोपा आणि एकसंघ ठेण्यासाठी प्रयत्न करायला हवे अस वर्षा गायकवाड म्हणाल्या.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 जूनपूर्वी दहावीचा आणि 15 जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. मात्र औरंगाबाद विभागी मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज विचारात घेता, निकाल उशिरा लागण्याची भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांचे शिक्षक संबंधित शाळांचे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला विलंब करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित शाळेचे मंडळ मान्यता काढून घेण्यात येईल आणि बोर्डाचा सांकेतिक क्रमांकही गोठवण्यात येईल, असाही इशारा बोर्डाने दिला आहे.
संबंधित बातम्या :
CIC Recruitment 2022 : केंद्रीय सूचना आयोगात अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी, 31 मेपर्यंत करु शकता अर्ज
मोठी बातमी! केंद्रीय विद्यालयांमध्ये खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशांना स्थगिती
Eastern Railway Vacancy 2022 : आता परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या तपशील
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI