HSC Result 2023: 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरही पाहता येणार बारावीचा निकाल; गुणपत्रिका डाऊनलोड करण्याचीही सुविधा
HSC Result 2023 Date: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे, सोबतच मार्कशीट देखील डाऊनलोड करता येणार आहे.
HSC Result 2023: बारावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 25 मे 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार आहे. यंदा निकालाची प्रत डाऊनलोड करण्याचा ऑप्शन देखील 'एबीपी माझा'च्या साईटवर देण्यात आला आहे.
Maharashtra HSC Result 2023 Date : बारावीचा निकाल एबीपी माझावर
यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला http://mh12.abpmajha.com वर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, बुधवारी 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
HSC Result 2023: असा पाहा निकाल
बारावीचा निकाल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही सहज पाहता येणार आहे.
स्टेप 1) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट http://mh12.abpmajha.com वर जा.
स्टेप 2) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचे नाव आणि रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5) त्यानंतर हा निकाल डाऊनलोड करण्यासोबत प्रिंटचा ऑप्शन देखील तुम्हाला उपलब्ध होईल.
मूळ गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI