![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
HSC Result 2022 Date : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार
HSC Result 2022 Date : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.
![HSC Result 2022 Date : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार Maharashtra Board 12th HSC Result 2022 Date Time HSC Result 2022 tomorrow MSBSHSE Likely To Announce tomorrow HSC Results mahresult.nic.in HSC Result 2022 Date : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/87e7b5e52c33dd80174ac87b0c36031b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
HSC Result 2022 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती.
कुठे पाहाल निकाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहात. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)