Paper Leak : "हा घ्या पुरावा..."; महाजनको परीक्षा पेपर फुटीच्या आरोपानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून फुटलेल्या पेपरचा फोटो समोर
Paper Leak : पेपरफुटीबाबत काही पुरावे असतील तर पोलिसांकडे सादर करावे, असे आवाहन महानिर्मितीने केलेलं, आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून फुटलेल्या पेपरचा फोटो जाहीर करण्यात आला आहे.
Paper Leak : महाजेनको परीक्षा पेपर फुटीच्या (Mahagenco Recruitment Examination Paper Leak) आरोपानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून फुटलेल्या पेपरचा फोटो समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे. दरम्यान, महाजेनको परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं केल्यानंतर महानिर्मितीकडून या संदर्भात खुलासा पाठवण्यात आला होता. त्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं थेट पेपर फुटल्याचा पुरावाच समोर आणला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, "ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर पदाच्या सेकंड स्टेजमधील सायकोमेट्री टेस्टच्या प्रश्नपत्रिका एका पानाचा फोटो बटन कॅमेराद्वारे काढला गेला आहे. हा पेपर ऑफलाईन होता आणि विभागाकडून सबमिट करून घेण्यात आला होता. म्हणजेच, पेपरचा फोटो बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता पण अत्याधुनिक हायटेक कॅमेऱ्याचा वापर करून सदर पेपर फोडून परीक्षा केंद्राबाहेर पाठवण्यात आल्याचा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप आहे."
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं ट्वीटमधून याप्रकरणाची SIT चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, "महानिर्मितीचे नक्की किती पेपर फुटले आहेत, किती घोटाळेबाज याप्रकारे उत्तीर्ण झाले आहेत? या घोटाळ्यामध्ये नक्की कोण-कोण सामील आहेत. या सर्वांसाठी महानिर्मितीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेची मा. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी चौकशी करण्यात यावी. स्टेज-1 मधील पण पेपर फुटल्याची शक्यता आहे त्यामुळे महानिर्मितीने याप्रकरणाची रीतसर FIR दाखल करावी आणि सरकारने SIT स्थापन करण्याची तत्काळ घोषणा करावी."
पेपरचा एकच भाग क्रॉप करून जाहीर करत आहोत कारण पूर्ण फोटो जाहीर केल्यास तो पूर्ण फोटो नक्की कोणता आहे कोणी पाठवला आहे हे घोटाळेबाजांना समजेल आणि त्या व्यक्तीनं आम्हाला हा फोटो पाठवला आहे, त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असंही समितीकडून सांगण्यात आलं आहे. या सगळ्या संदर्भात आपण महानिर्मितीसोबतच संबंधित कंपनीकडे पाठपुरावा करून तक्रारी दाखल केल्याचंही समितीचं म्हणणं आहे.
#MahaGenco नोकर भरतीचा फोडलेला पेपर आम्ही जाहीर केला आहे.
— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) October 8, 2023
विशेष म्हणजे या खात्याचे, महाराष्ट्राचे "ऊर्जा मंत्री" खुद्द #देवेंद्र_फडणवीस साहेब आहेत. आम्ही पुराव्यानीशी सिद्ध केलंय की पेपर फुटला आहे, आता घोटाळेबाजांवर आपण काय कार्यवाही करता ते आम्हाला बघायचंच आहे.@Dev_Fadnavis https://t.co/i7QH6jjFYu
ट्वीटमध्ये पुढे म्हटलंय की, "नोकर भरतीचा फोडलेला पेपर आम्ही जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या खात्याचे, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही पुराव्यानीशी सिद्ध केलंय की, पेपर फुटला आहे, आता घोटाळेबाजांवर आपण काय कार्यवाही करता ते आम्हाला बघायचंच आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI