(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? या तीन ठिकाणी निघाली बंपर भरती, आजच करा अर्ज
Job Majha : एअर इंडिया एअर सर्विसेस लि., न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
एअर इंडिया एअर सर्विसेस लि.
विविध पदांच्या 604 जागांसाठी भरती होत आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पहिली पोस्ट – हँडीमन/ हँडीवूमन
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
एकूण जागा – 277
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 22 एप्रिल 2022
तपशील - www.aiasl.in
दुसरी पोस्ट – कस्टमर एजंट
शैक्षणिक पात्रता - पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA किंवा IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर आणि एक वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 206
वयोमर्यादा – 28वर्षांपर्यंत
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 22 एप्रिल 2022
तपशील - www.aiasl.in
तिसरी पोस्ट - युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा – 96
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण कोलकाता आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - HRD Department, Air India Premises, AI Airport Services Limited New Technical Area, GS Building, Ground Floor, Kolkata: 700 052
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 22 एप्रिल 2022
तपशील - www.aiasl.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment वर क्लिक करा. Advertisement of Kolkata Recruitment यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
या पोस्टव्यतिरिक्त टर्मिनल मॅनेजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर टर्मिनल, रॅम्प सर्विस एजंट य़ाही पोस्टसाठी जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
NPCIL (न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.)
कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट – कार्यकारी प्रशिक्षणार्थी (यात मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech
एकूण जागा – 225 (यात मेकॅनिकलसाठी 87 जागा, केमिकलसाठी 49, इलेक्ट्रिकलसाठी 31 , इलेक्ट्रॉनिक्ससाठी 13, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 12आणि सिव्हिलसाठी 33जागा आहेत. )
वयोमर्यादा – 26वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
तपशील - www.npcilcareers.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूलाच तुम्हाला recruitment of executive trainees (2022) in NPCIL through Gate ही लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बँक ऑफ बडोदा
विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - प्रोडक्ट हेड (प्रायव्हेट बॅंकिंग), ग्रुप सेल्स हेड (व्हर्चुअल RM सेंटर), प्रायव्हेट बँकर- रेडियन्स प्रायव्हेट
शैक्षणिक पात्रता – या तिनही पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि प्रोडक्ट हेडसाठी तीन वर्षांचा अनुभव, ग्रुप सेल्स हेड पदासाठी १० वर्ष आणि प्रायव्हेट बँकर पदासाठी १२ वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.
एकूण जागा – 22 (यात प्रोडक्ट हेडसाठी 20 जागा आणि ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकरसाठी प्रत्येकी एक जागा आहे.
वयोमर्यादा – प्रोडक्ट हेडसाठी 24 ते 45 वर्ष, ग्रुप सेल्स हेडसाठी 31 ते 45 वर्ष, प्रायव्हेट बँकरसाठी 33 ते 50 वर्ष ही वयोमर्यादा हवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022
तपशील - www.bankofbaroda.in
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI