JEE Main 2022 : परीक्षेच्या तारखा बदलल्या, NTA कडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज पुन्हा सुरू
JEE Main 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्यास चुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे.
JEE Main 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्यास चुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यास पुन्हा सुरू केले आहे. याअंतर्गत आता ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख 18 एप्रिल ते 25 एप्रिल रात्री 9 वाजेपर्यंत आहे.
फी जमा करण्याची तारीख
JEE Mains 2022 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा पर्याय NTA ने दिला आहे. विद्यार्थी नोंदणी फॉर्म भरून NTA च्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. एनटीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अर्ज फी जमा करण्याची तारीख 25 एप्रिल रोजी रात्री 11:50 पर्यंत राहील.
JEE (Main)dates rescheduled to enable students across the country to prepare well for the exams. @dpradhanbjp @EduMinOfIndia pic.twitter.com/QYABHnd7SC
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022
परीक्षेची तारीख बदलली
यासोबतच परीक्षेच्या तारखाही बदलण्यात आल्या आहेत. जेईई मुख्य सत्र 1 परीक्षेच्या तारखा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 आहेत. त्याच वेळी, जेईई मुख्य सत्र 2 ची परीक्षा 21 ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. यापूर्वी जेईई मुख्य सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा 21, 24, 25 एप्रिल, 29 एप्रिल आणि 1 मे रोजी ठेवण्यात आल्या होत्या.
NTA च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध
अधिक तपशील आणि अपडेटसाठी उमेदवारांना NTA च्या www.nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला दिला जातो. JEE (मुख्य) - 2022 बाबत अधिक माहितीसाठी, उमेदवार 011- 40759000/011-69227700 वर संपर्क साधू शकतात किंवा jeemain@nta.ac.in वर ईमेल करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी उमेदवारांसाठी अनेक प्रवेश परीक्षांचे आयोजन करते. NTA द्वारे JEE परीक्षा देखील आयोजित केली जाते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा घेतली जाते. आता या परीक्षा जून आणि जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून देण्यात आली आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड त्यासोबतच कोणत्या शहरांमध्ये परीक्षा होणार त्याबाबत लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI