(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railway Jobs 2022 : दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये मेगा भरती; कसा कराल अर्ज?
Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वे क्रीडा कोट्याअंतर्गत दक्षिण पूर्व रेल्वेद्वारे मेगा भरती जारी करण्यात आली आहे.
Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वे क्रीडा कोट्याअंतर्गत (Sports Quota) अनेक पदांसाठी भरती करत आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी आहे.
दक्षिण पूर्व रेल्वेद्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या भरतीअंतर्गत 21 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी 3 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाईट (Official Website) rrcser.co.in वर जाऊ अर्ज करु शकता.
भारतीय रेल्वे क्रीडा कोट्याअंतर्गत दक्षिण पूर्व रेल्वेद्वारे काढण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) दोन फेब्रुवारी आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावं की, ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे. त्यामुळे राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू या भरतीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावं.
अर्ज भरण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट rrcser.co.in ला भेट द्यावी
- वेबसाईटच्या होमपेजवर क्रीडा कोट्याअंतर्गत भरती संबंधित लिंकवर क्लिक करा
- आता विचारलेली सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि कागदपत्रे अपलोड करा
- आता पुन्हा एकदा सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
- पुढील प्रक्रियेसाठी ऑनलाईन भरलेला अर्ज डाऊनलोड (Download) करा आणि त्याची प्रिंट काढा
शुल्क
UR/OBC साठी परीक्षा शुल्क ₹500/- आहे आणि SC/ST/PwD श्रेणीतील उमेदवारांसाठई परीक्षा शुल्क ₹250/- आहे. बँक ड्राफ्ट/आईपीओ एफए आणि सीएओ, दक्षिण पूर्व रेलवे, गार्डन रीच - 700043 मध्ये डिपॉझिट करावा. हे जीपीओ/कोलकाता येथे देय आहे.
महत्त्वाची माहिती
ईशान्येकडील राज्ये, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, लाहौल आणि स्पिती जिल्हा आणि हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पांगी उपविभाग, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमधील रहिवाशांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Infosys Recruitment 2022 : IT इंडस्ट्रीमध्ये नोकरी शोधताय? मग 'ही' संधी सोडू नका, इन्फोसिसमध्ये 55 हजार लोकांची भरती
- SEBI Recruitment 2022 : सेबीमध्ये मोठी भरती; लगेचच अर्ज करा, संधी सोडू नका
- Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलात भरतीची जाहिरात बोगस, जाहिरातीवर विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचं आवाहन
- NEET PG Counselling: ठरलं! 'या' तारखेपासून सुरु होणार नीट पीजी काऊंसलिंग; केंद्रीय मंत्री मांडवियांची घोषणा
- Civil Services Main examination : युपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI