ICSE, ISC Semester 2 Exam 2022 : विद्यार्थ्यांनो लक्ष असू द्या; दहावी-बारावी परीक्षेसाठी नियमात झाले बदल, जाणून घ्या...
ICSE, ISC Semester 2 Exam 2022 From 25 April : परिक्षेच्या दरम्यान आणि परिक्षेला जाण्याआधी या गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यावे-
ICSE, ISC Semester 2 Exam 2022 From 25 April : 'काउंन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स' (ICSE) आणि ISC बोर्डच्या परिक्षा लवकरच सुरू होत आहेत. 10 वी आणि 12वींच्या परिक्षा (ICSE, ISC) 25 एप्रिलपासून सुरू होतील तर 20 मे 2022 पर्यंत संपतील. यावर्षी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षेपूर्वी काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. परिक्षेच्या दरम्यान आणि परिक्षेला जाण्याआधी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या-
या नियमांचे पालन करा
परिक्षेची वेळ- पेपर लिहित असताना वेळेकडे लक्ष द्या. दहावीच्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षेसाठी एक तास तीस मिनीटे वेळ देण्यात आला आहे. तर ही परिक्षा 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा असणार आहे.
रिपोर्टिंग टाइम- विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवशी परिक्षा सुरू होण्याच्या तीस मिनीट आधी परिक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करा
विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग या नियमांचे पालन विद्यार्थांनी करावे. तसेच परिक्षा केंद्रावरून बाहेर जाताना आणि आत येताना गर्दी करू नका.
सोबत ठेवा या गोष्टी ठेवा
विद्यार्थांनी परिक्षेला जाताना सोबत एक पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर, पेन्सिल पेन तसेच इतर स्टेशनरी संबंधित सामान घेऊन जावे.
प्रवेशपत्र
विद्यार्थ्यांनी परिक्षेला जाताना प्रवेशपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे प्रवेशपत्र नसेल तर तुम्ही परिक्षेला देऊ शकणार नाही.
कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्यार्थाकडे सापडले तर त्या विद्यार्थ्यावर कडक कारवाई ऐकेली जाऊ शकते. त्यामुळे स्मार्ट घड्याळे, स्मार्ट फोन, फीचर फोन, ब्लूटूथ हेडफोन ही उपकरणे विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर घेऊन जाऊ नयेत.
हेही वाचा :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI