एक्स्प्लोर
विशेष मुलांचं शिक्षण परत कसं सुरु होणार?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरु करणं जरी शक्य नसलं तरीही जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करणार असल्याचं शालेय विभागानं सांगितलं आहे. विशेष मुलांच्या शिक्षणाच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांचे शिक्षण परत कसं सुरु करायचं? याबाबत विचार सुरु आहे.
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरु करणं जरी शक्य नसलं तरीही जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करणार असल्याचं शालेय विभागानं सांगितलं आहे. जिथे शाळा सुरु करणं शक्य नाही तिथे मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना आहे. ही सगळी तयारी सुरु असताना विशेष मुलांच्या शिक्षण किंवा त्यांचं शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत अजूनही काही स्पष्टता आलेली नाही. विशेष मुलांच्या शिक्षणाच्या गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्यांचे शिक्षण परत कसं सुरु करायचं याची चाचपणी त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून सुरु आहे.
'विशेष मुलांची शाळा किंवा त्यांच्या थेरपीजच्या बाबतीत अजुनही काही स्पष्टता आलेली नाहीये. मुख्य म्हणजे या विषयावर चर्चाही होत नाहीये. माझ्या ऑटीझम सेंटरमध्ये 45 मुलं आहेत. पण आता त्यांचे शिक्षण किंवा त्यांच्या थेरपीज कशा सुरु करायच्या हा प्रश्न आहे', असं पुण्यातील प्रसन्न आॅटिजम सेंटरच्या संचालिका साधना गोडबोले यांनी सांगितलं.
विशेष मुलांना ऑनलाईन शिक्षण देणं कितपत शक्य होईल हा सुद्धा एक प्रश्न आहे. 'कोरोनाचा संसर्ग वाढताच आम्ही ऑ नलाईन शिक्षणासाठीचा वेगळा सिलॅबस तयार केला. जे मुलं ऑडिओ आणि व्हिज्यूएल माध्यमातून शिकू शकतात त्यांच्यासाठी हे माध्यम वापरतोय. पण काही विशेष मुलांसाठी हे माध्यम प्रभावी ठरत नाही. त्यांच्यासाठी आम्ही वर्क शीट बनवून पालकांना दिल्या आहेत. त्यांची टीचर त्यांच्याशी आठवड्यातून एकदा व्हिडीओवर बोलते. मुलांच्या संपर्कात राहणं फार महत्त्वाचं असतं', विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या प्रिजम फाऊंडेशनच्या डायरेक्टर हर्षा मुळे यांनी सांगितलं.
विशेष मुलांच्या ऑनलाईन शिक्षणातील अडचणी सांगताना साधना गोडबोले म्हणाल्या की, 'ऑटिस्टिक मुलं ही थेट आय काॅन्टॅक्ट करत नाहीत. ती हायपर अॅक्टिव्हही असतात. त्यांना ऑनलाईन शिक्षण देणं कसं शक्य होईल? या मुलांसाठी त्यांच्या थेरपी हा औषधासारख्या असतात. त्यामुळे त्यांना वैयक्तिक काळजीची गरज असते. ऑनलाईन शिक्षणामुळे 100टक्के परिणाम दिसतीलच असं नाही.'
मुख्य म्हणजे की, त्यांना शाळेत पाठवण्याच्या बाबतीत आता पालकांनाही चिंता वाटते आहे. सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था करुनच शाळा सुरु करण्याबाबत विचार करावा लागेल. 'शाळा उघडण्याचा निर्णय जर झाला तर त्यासाठी आम्ही रोडमॅप तयार ठेवला आहे. मुलांना तीन-तीनच्या ग्रुपमध्ये बोलवायचं असं ठरवलं आहे. पण आधी त्यांना चेहऱ्यावर पूर्णवेळ मास्क ठेवण्याची आणि सारखे हात धुण्याची सवय लावावी लागेल', असं हर्षा मुळे यांनी सांगितलं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement