एक्स्प्लोर

तुम्हीच सांगा! बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणं कशी रोखायची?; शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून बोर्डाने मागितला कृती कार्यक्रम

SSC-HSC Exam :दहावी, बारावी परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी बोर्डाने शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून कृती कार्यक्रम मागितला आहे. लोकसहभागातून अशाप्रकारे पहिल्यांदाच कृती कार्यक्रम तयार करण्यात येत आहे.

SSC-HSC Exam : राज्य मंडळाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत (SSC-HSC Exam) होणाऱ्या कॉपी (Copy) प्रकरणाला आळा घालण्यासाठी कृती कार्यक्रम बोर्डाकडून (Maharashtra State Board) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक (Teachers), पालक (Parents), विद्यार्थी (Student) यांच्याकडून 20 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने कृती कार्यक्रम (Action Program) मागवण्यात आला आहे. लोकसहभागातून अशाप्रकारे पहिल्यांदाच कृती कार्यक्रम तयार करण्यात येत आहे.

राज्य मंडळाची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून होणारे कॉपी प्रकरणं रोखणं हे बोर्डासमोर आव्हान असते. 

गैरप्रकार रोखण्यासाठी एकसूत्रता आणण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्याचा निर्णय

 मात्र, हे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली नऊ विभागीय केंद्रे आपापल्या स्तरावर उपाययोजना आणि उपक्रम राबवतात. या प्रयत्नांमध्ये एकसूत्रता आणण्याची गरज सातत्याने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने कृती कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कृती कार्यक्रम मागवण्यात आला आहे. प्राप्त होणाऱ्या कृती कार्यक्रमांचे तज्ज्ञ समितीमार्फत परीक्षण करुन दहा कृती कार्यक्रमांची निवड करण्यात येईल. तसेच संबंधित कृती कार्यक्रम पाठवणाऱ्यांना गौरवण्यात येईल. 

लोकसहभागातून कृती कार्यक्रम मागवला

मागील वर्षी मोबाईल फोनचा वापर करुन कॉपी केल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. त्याशिवाय, इतर अनेक पर्याय कॉपी करताना वापरले. सर्वच विभागामध्ये ही कॉपी प्रकरण समोर येतात यासाठी खास भरारी पथक सुद्धा कार्यरत असते. मात्र, यासोबत आणखी कृती कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचा विचार राज्य मंडळाचा आहे. त्याच अनुषंगाने कृती कार्यक्रम लोकसहभागातून मागवण्यात येत आहे.

दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक पूर्णवेळ हजर राहणार

दरम्यान दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रांवर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलली जाणार असल्याचं मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठ्याप्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाले होते. काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठी जागा नसल्याने शामियाना टाकून बसवण्यात आले होते. तर काही ठिकाणी विषय शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे औरंगाबादच्या या घटनांची दखल अधिवेशनात घेण्यात आली होती. त्यामुळे यंदा कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळातर्फे विशेष खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातमी

SSC-HSC Exam: आता दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद; अशी असणार बैठक व्यवस्था

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget