एक्स्प्लोर

शाळाबाह्य मुलांसाठी राज्य सरकारचं नवं अभियान, दीपक केसरकरांनी दिली महत्वाची माहिती 

शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या (Education ) प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Vasant Kesarkar) यांनी आज विधानसभेत दिली.

नागपूर : राज्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या (Education ) प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Vasant Kesarkar) यांनी आज विधानसभेत दिली. शाळाबाह्य मुलांबाबतचा प्रश्न जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. 

दीपक केसरकर सभागृहात बोलताना म्हणाले की, 17 ऑगस्ट, 2023 ते 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात 1624 मुले व 1590 मुली असे एकूण 3214 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण 356 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. मुंबईतील ही सर्व 356 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात 380 बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी 297 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये 38 बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये 928 बालके शाळाबाहय आढळून आले.  सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये 71 बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर 94 अशी एकूण 165 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत 763 बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्यात विशेषत: पालघर, ठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.       

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू -

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.  या वेळी ॲड. आशिष शेलार, नाना पटोले, ॲड. यशोमती ठाकूर, योगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारले.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

ITI Equivalence : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता देणारे गोवा देशातील पहिले राज्य
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता देणारे गोवा देशातील पहिले राज्य
Latur Re NEET Result : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटगावकरांच्या 'RCC'ची नीट निकालात भरारी; 550 विद्यार्थ्यांना 530 हून अधिक गुण
नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटगावकरांच्या 'RCC'ची नीट निकालात भरारी; 550 विद्यार्थ्यांना 530 हून अधिक गुण
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget