एक्स्प्लोर

ICSE ISC Result 2023 : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल?

ICSE ISC Result 2023: केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.

ICSE ISC Result 2023: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल हा 98.94 टक्के लागला आहे. तर आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल 96.93 टक्के लागला आहे. विद्यार्थी  बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.

मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर आज दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाले.

जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा आज दुपारी 3 वाजता सुरु होईल आणि 21 मे पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

ICSE, ISC निकाल 2023 कसा पाहायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा.
स्टेप 2: होम पेजवर, 'ICSE किंवा ISC कोर्स' निवडा.
स्टेप 3: आता इंडेक्स नंबर, UID आणि कॅप्चा कोड सारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स एन्टर करा.
स्टेप 4: तुमचा 'ICSE वर्ग दहावी निकाल 2023' किंवा 'ISC वर्ग बारावी निकाल 2023' स्क्रीनवर उघडेल.
स्टेप 5: ते तपासा आणि निकाल डाऊनलोड करा.
स्टेप 6: विद्यार्थी निकालाची डिजिटल मार्कशीट डाऊनलोड करु शकतात आणि प्रिंटआऊट घेऊ शकतात.

यंदाही मुलींची बाजी...

यावर्षी दहावीच्या परीक्षेत एकूण 98.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत  एकूण 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई (दहावी) बोर्डात 99.21 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 98.71 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.  आयएससी (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत 98.01टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 95.96 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. 

आयएससी बारावी बोर्ड परीक्षेत देशातून 5 विद्यार्थी पहिल्या रँक वर आले आहेत. तर दहावी बोर्ड परीक्षेत 9 विद्यार्थी पहिल्या रँक वर आहेत. दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून ठाण्याच्या सुलोचनदेवी सिंघानिया शाळेची इप्शिता भट्टाचार्य दहावी बोर्ड परीक्षेत देशात पहिली आली आहे. तर बारावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेची विद्यार्थिनी श्रेया उपाध्ये देशात पहिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

CBSE 10th Result 2023 : सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल घोषित, 93.12 टक्के निकाल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget