CBSE 10th Result 2023 : सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल घोषित, 93.12 टक्के निकाल
CBSE 10th Result 2023 : CBSE ने बारावी पाठोपाठ दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
CBSE 10th Result 2023 : सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. CBSE ने बारावी पाठोपाठ दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 1.28 टक्क्यांनी निकाल घसरला आहे.
दहावी परीक्षेच्या निकालातही केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्याने (99.91 टक्के) अव्वल स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राचा निकाल 96.92 टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीतही मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.25 आणि मुलांचं 92.27 इतकं आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 90 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 1.98 टक्के जास्त आहे.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.
असा पाहा निकाल
- निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे cbse.gov.in वर जा.
- इथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE दहावी निकाल 2023 लिंक वर.
- नवीन पेज ओपन होईल. उमेदवारांना या पेजवर त्यांचे लॉगिन तपशील एन्टर करावे लागतील.
- रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील एन्टर करा आणि सबमिट बटण दाबा.
- असे केल्यास निकाल तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतील.
- इथे निकाल चेक करा, डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.
कधी झाल्या होत्या परीक्षा?
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु झाल्या होत्या. बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या. तर सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या.
21 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
यंदा दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी एकूण 21,84,117 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 21,65,805 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि 20,16,779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.12 इतकी आहे.
मेरीट लिस्ट नाही
सीबीएसई बोर्ड दहावीच्या टॉपर्स विद्यार्थ्यांची यादी आणि गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही. सीबीएसई आपल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय किंवा तृतीय डिव्हिजन देत नाही. सीबीएसई दहावीची गुणवत्ता यादी केवळ त्या 0.1 टक्के विद्यार्थ्यांना जारी केली जाईल ज्यांना विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
हेही वाचा
CBSE 12th Result 2023 OUT : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI