SSC Result : 12 व्या वर्षीचं मॅट्रीक पास, नवी मुंबईतील विद्यार्थ्याला दहावीत 62 टक्के
12 Year old Boy Clears SSC Exam : नवी मुंबईतील सहजप्रीत सिंह यांनं दहावीच्या परीक्षेत 62 टक्क्यांनी पास होत घवघवीत यश मिळवलं आहे. दहावीच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा आवश्यक नाही, असं सहजप्रीतनं म्हटलं आहे.
SSC Result 2022 : नवी मुंबईतील 12 वर्षीय मुलानं चक्क दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. ऐकून थक्क झालात ना? मात्र हे खरं आहे. नवी मुंबईत 12 मुलानं हा अजब कारनामा केला आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या सहजप्रीत सिंह (Sahejpreet Singh) या 12 वर्षीय मुलानं SSC परीक्षेत यश मिळवलं आहे. सहजप्रीत दहावीत 62 टक्क्यंनी पास झाला आहे. तो दहावीत यश मिळवणारा राज्यातील सर्वात कमी वयाचा मुलगा ठरला आहे.
SSC परीक्षेला बसण्यासाठी 14 वर्षे वय असणं आवश्यक
साधारणपणे नियमित किंवा खाजगी विद्यार्थी म्हणून एसएससी परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्याचं वय 14 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मुंबई विभागीय मंडळाचे सचिव एस.आर. बोरसे यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, 'मी या विद्यार्थ्याबद्दल ऐकले नाही. मात्र त्यानं दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष विनंती मिळवली होती.'
सहजप्रीतला आयआयटीमधून बीटेक करायचंय
सहजप्रीतनं निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, 'मला आयआयटीमधून बीटेक करण्याचं आहे.' सहजप्रीतचे वडील गुरुशरण यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी मथुराहून नवी मुंबईत आल्यावर सहजप्रीतला दहावीला प्रवेश मिळणं अवघड झालं. नवी मुंबईतील शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी बरीच भटकंती करावी लागली. त्यानंतर आम्ही शिक्षण विभागाशी संपर्क साधला आणि अखेर त्याला दहावीला प्रवेश देण्याची परवानगी मिळाली. एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच सहजप्रीतने अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली.
सहजप्रीत खारघरच्या केपीसी शाळेत शिकतो. तो त्याचा बहुतेक वेळ गेमिंग अॅप्सवर गेम खेळण्यात घालवतो. सहजप्रीतनं म्हटलं आहे की, बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी वयाची मर्यादा असू नये.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra SSC 10th Result 2022 : गुणपडताळणी कधीपासून? विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांची फोटो कॉपी मिळणार, जाणून घ्या सविस्तर
- Maharashtra SSC 10th Result 2022 :अजब निकालाची गजब गोष्ट! पुण्याचं पोरगं काठावर पास; सगळ्या विषयात 35 मार्क
- Maharashtra SSC Result 2022: शंभर नंबरी कामगिरी! 122 विद्यार्थ्यांना दहावीत 100 टक्के गुण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI