(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra SSC 10th Result 2022 :अजब निकालाची गजब गोष्ट! पुण्याचं पोरगं काठावर पास; सगळ्या विषयात 35 मार्क
पुण्याच्या शुभम जाधव या विद्यार्थ्याला 35 टक्के मिळाले आहेत. त्याच्या या मार्कांची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.
Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेकांनी उत्तम गुण आहेत. राज्यातील 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळवले आहेत. मात्र सगळीकडे चर्चा सुरु आहे ती 35 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची. पुण्याच्या शुभम जाधव या विद्यार्थ्याला 35 टक्के मिळाले आहेत. त्याच्या या मार्कांची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.
मराठी, हिन्दी, इंग्रजी, गणित, विज्ञान या पाचही विषयात त्याला 35 गुण मिळाले आहेत. शुभम हा पुण्यातील गंजपेठेत राहतो. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तो हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. दरमहा त्याला सहा हजार रुपये पगार मिळतो. वडिल पाण्याच्या टाकीचं दुरुस्तीचं काम करतात तर आई केअर टेकर म्हणून काम करते. नवव्या वर्गात त्याला 67 टक्के मार्क पडले होते. दहावीत त्याने सगळ्या विषयाचा अभ्यास केला होता. जास्त मार्क मिळतील अशी त्याची अपेक्षा होती. मात्र त्याला कमी मार्क पडले.
शुभम पुण्यातील गंज पेठेतील जानाई माळा टिंबर मार्केट जवळ राहतो. रमणबाग शाळेचा तो विद्यार्थी आहे. 1 वाजता मित्रमंडळींबरोबर त्याने निकाल पाहिला. निकाल पाहिल्यानंतर त्याला सगळ्याच विषयात 35 मार्क मिळाल्याचं दिसलं. त्याच्या मित्रांना मात्र जास्त मार्क मिळाले त्यामुळे शुभमचा नाराजीचा सुर आहे. मात्र काठावर पास होणं काय असतं याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजेच शुभम जाधव आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
संबंधित बातम्या
Maharashtra ssc 10th result 2022: दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण, राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के
Maharashtra ssc 10th result 2022: शत प्रतिशत निकाल! 12 हजार शाळांचा रिझल्ट 100 टक्के
SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 टक्के शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये