प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्राचाच आवळला गळा; 24 तासांत दोन आरोपीला बेड्या
प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्राचाच खून केल्याची घटना बोईसरमध्ये घडली आहे. या प्रकरणातील आरोपीना 24 तासांत बोईसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पालघर : बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडल्याने बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मित्रावर प्रेमसंबंधाचा संशय घेवून त्याचा गळा आवळून खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत दोन आरोपींना बोईसर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक आरोपी मृत बेपत्ता मित्राला शोधण्यासाठी त्याच्याच कुटुंबासोबत फिरत बनाव करत होता.
बोईसर परिसरातील अवधनगर रोशन गँरेज गल्ली येथे राहणारा शिवरत्न रॉय (उर्फ शिवम) हा शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर पब्जी खेळत असताना त्याला त्यांचा मित्र अबुझर लयीयास सिद्धीकी याने व्हॉट्सएप कॉल करून बाहेर बोलवले होते. घरात काहीही न सांगता गेलेल्या शिवम रॉय याचा मृतदेह बुधवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या गंगोत्री हॉटेल समोरील मैदानात झाडीमध्ये आढळून आला होता. अधिक माहिती अशी की, मॉत शिवम रॉय याला व्हॉट्सएप कॉल करून आरोपी अबुझर सिद्धीकी (वय 19) याने बाहेर बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी गंगोत्री हॉटेल समोर असलेल्या मैदानात निर्जनस्थळी असलेल्या जागेवर नेऊन त्याला मारहाण करून त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अबुझर सिद्धीकी व आरिफ खान यांनी शिवमचा मृतदेह जवळच्या झाडीत फेकून दिला.
संतापजनक... बापाकडून अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर, दिला बाळाला जन्म, नराधम पित्याला बेड्या
आरोपीचा बनाव उघड मित्राची हत्या केल्यानंतर शेवटचा कॉल आलेल्या अबुझर लयीयास सिद्धीकी याची पोलिसांनी देखील चौकशी केली होती. यातच हा आरोपी स्वतःहुन खुन केलेल्या मित्राचा शोध घेण्याचा बहाणा करून मृत मित्रांच्या कुटुंबासोबत फिरत होता. आतापर्यंत गेल्या सहा महिन्यात बोईसर पोलिसांनी कमी कालावधीत चार हत्त्या प्रकरणाचा छडा लावला असून कौतुकास्पद कारवाई केली आहे. यामध्ये बाईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी आपली टीम पोलीस शिपाई वैभव जामदार, अशपाक जमादार, देवा पाटील, वाघचौरे, हवालदार मर्दे यांच्या मदतीने गुन्ह्याचा संपूर्ण उलघडा केला असून आरोपी अबुझर लयीयास सिद्धीकी व आरिफ खान याला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील करीत आहेत.
Gold Chain | 21 वर्षांपूर्वी चोरी झालेली सोन्याची चेन परत मिळाली, मुंबई लोहमार्ग पोलिसांची कामगिरी