संतापजनक... बापाकडून अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर, दिला बाळाला जन्म, नराधम पित्याला बेड्या
बापानं पोटच्या मुलीवर शारिरिक अत्याचार केल्यानं मुलगी गरोदर राहिली आणि यातूनच या मुलीनं एका बाळाला देखील जन्म दिला आहे. या धक्कादायक घटनेनं रत्नागिरी जिल्हा हादरला असून घाटकोपरमधील पंतनगर पोलिसांनी नराधम बापाला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावातून अटक केली आहे.

रत्नागिरी: बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. बापानं पोटच्या मुलीवर शारिरीक अत्याचार केल्यानं मुलगी गरोदर राहिली आणि यातूनच या मुलीनं एका बाळाला देखील जन्म दिला आहे. या धक्कादायक घटनेनं रत्नागिरी जिल्हा हादरला असून घाटकोपरमधील पंतनगर पोलिसांनी बापाला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावातून अटक केली आहे.
या नराधम बापाला कठोर शिक्षेची मागणी आता जनमाणसांतून होत आहे. सदर नराधम बाप आपल्या कुटुंबासह मुंबईतील घाटकोपरमध्ये राहतो. तो एका मॉलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होता. एके दिवशी पहाटे पाचच्या सुमारास तो हॉलमध्ये झोपलेल्या आपल्या मुलीशी लगट करू लागला. यावेळी मुलीनं विरोध देखील केला. पण, बापानं जबरदस्तीनं मुलीवर अत्याचार केले. शिवाय, सारा घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास मी मरून जाईन, अशी धमकी त्यानं मुलीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं घडला प्रकार कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर देखील बापाकडून मुलीवर अधूनमधून अत्याचार सुरू होते.
गावी येऊनही केले अत्याचार दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात मुलीनं या साऱ्या प्रकारातून सुटका मिळवण्यासाठी गाव गाठलं. मात्र त्यानंतर देखील काहीना काही निमित्त काढत बाप देखील गावी आला. याकाळात देखील त्यानं मुलीवर अत्याचार सुरूच ठेवले. यातून मुलगी गर्भवती देखील राहिली. आपण गर्भवती असल्याचे लक्षात येताच मुलीनं थेट मुंबई गाठली. एके रात्री पोटात दुखु लागल्यानं सारी कथा तिनं आपल्या बहिणीला सांगितली. यावेळी डॉक्टरांनी देखील मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. यानंतर बापाविरोधात मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातून संताप आणि चीड दरम्यान, या प्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलीसांनी संगमेश्वर तालुक्यातील गावी जात बापाला अटक केली आहे. सारा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातून चीड आणि संताप व्यक्त केला जात आहे. या साऱ्या प्रकरणात बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता परिसरातून होत आहे.
























