एक्स्प्लोर

लेकाचा आकस्मित मृत्यू समजून अंत्यविधीची तयारी, मृतदेहाला आंघोळ घालताना व्रण दिसले, सूनेनेच हत्या केल्याचं उघड!

Gondia Crime News : रात्री झोपेत असतानाच पत्नीने नवऱ्याचा जीव (Crime News) घेतला. कुटुंबियांनी आकस्मित मृत्यू म्हणून अंत्यविधीची सर्व तयारी केली. पण..

Gondia Crime News Update : पतीने नवऱ्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात (Gondia Local News) घडली आहे.  मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मेघशाम भावे असे आहे. तर आरोपी महिलेचं नाव वैशाली मेघशाम भावे असे आहे. रात्री झोपेत असतानाच पत्नीने नवऱ्याचा जीव (Crime News) घेतला. कुटुंबियांनी आकस्मित मृत्यू म्हणून अंत्यविधीची सर्व तयारी केली. पण मृतदेहाला आंघोळ गालाताना गळ्यावर व्रण दिसले. त्यानंतर घातपात झाल्याचा संशय मनात आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी (police) पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सत्य बाहेर आले. 

घटना काय आहे? 

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईसापुर येथील रहिवासी असलेले मेघशाम भावे (42) यांचा खून झाला. पत्नी वैशाली मेघशाम भावे (38) हिने पती मेघशाम भावे यांची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. 11 जून 2024 च्या रात्री जेवन करुन भावे कुटुंबीय झोपी गेले होते. पती झोपेत असताना पत्नी वैशाली हिने मेघशाम भावेचा गळा आवळून खून केला.  सकाळ होऊन सुद्धा मुलगा जागा झाला नसल्याने वडील कुंडलीक भावे यांनी मेघशामला हाक दिली, पण मुलाने प्रतिसाद न दिल्यामुळे वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करुन उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा मेघशामचं शरीर त्यांच्या हाताला थंड लागल्याने मुलगा मरण पावल्याचे निदर्शनास आले. 

मृतदेहाला आंघोळ घालताना व्रण दिसले अन्.. 

मुलगा मेघशाम याचा आकस्मिक मृत्यु झाला समजून अंत्यविधीची सर्व तयारी पूर्ण कऱण्यात आली. संपूर्ण नातेवाईक आल्यानंतर दुपारी 1 वाजता अंत्यविधी साठी रितीरिवाजाप्रमाणे मेघशामच्या मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली. पण त्यावेळी त्याच्या गळ्यावरती गळफास सारखे काळ्या रंगाचे निशाण दिसून आले. ही बाब आई-वडिल आणि नातेवाईकांच्या लक्षात येताच मेघशामचा आकस्मिक मृत्यु नसून हत्या करण्यात आल्याचा संशय आला. या बाबतची माहिती कुटुंबियांनी अर्जुनी मोरगाव पोलीसांना दिली. अर्जुनी मोरगाव पोलीसांनी कसलाही विलंब न करता तात्काळ ईसापुर येथे जात मेघशाम भावेंचे घर गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. संशयावरुन पत्नी वैशाली हिला ताब्यात घेवून कसून चौकशी केली. चौकशीमध्ये पत्नीने मेधशामचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. तर हत्येमागचं नेमक कारण काय ? याचा तपास मोरगांव अर्जूनी पोलिस घेत आहेत. मोरगांव अर्जुनी पोलिसांनी पत्नीच्या विरोधात भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

आणखी वाचा :

मोठी बातमी : ऑनलाईन ऑर्डर केलेल्या Ice cream कोनमध्ये आढळला तुटलेल्या बोटाचा तुकडा, मुंबईतील खळबळजनक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget