(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai Mob Lynching Attempt : वसईमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मॉब लिचिंगचा प्रकार
Vasai Mob Lynching Attempt : वसईमध्ये पोलिसांच्या (Vasai Police) सतर्कतेमुळे मॉब लिचिंगचा (Mob Lynching) प्रकार टळला आहे. पोलीस वेळेवर पोहोचले त्यामुळे तिघांचा जीव वाचला आहे. कारने एका वृद्धेला धडक दिली.
Vasai Mob Lynching Attempt : वसईमध्ये पोलिसांच्या (Vasai Police) सतर्कतेमुळे मॉब लिचिंगचा (Mob Lynching) प्रकार टळला आहे. पोलीस वेळेवर पोहोचले त्यामुळे तिघांचा जीव वाचला आहे. कारने एका वृद्धेला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने कारमधील तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पोलीस (Vasai Police) वेळेवर पोहोचल्याने मॉब लिचिंगचा (Mob Lynching) प्रकार टळला आहे. वसईमध्ये शनिवारी (दि.24) 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, वसईमध्ये शनिवारी रात्री 9 च्या सुमारास सत्पाले येथे एका महिंद्रा एसयूव्ही या कारने एका 60 वर्षीय वृद्धेला धडक दिली. यात या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला आहे. नौसी बसवत असं वृध्द महिलेच नाव आहे. महिलेच्या मृत्यूनंतर भडकलेल्या नागरिकांनी गाडीची तोडफोड केली. गाडीतील तिघांना मारहाण ही केली. यात तिघांना गंभीर दुखापत झाली असती पण अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहचल्याने तिघांचा जीव वाचला आहे. अर्नाळा सागरी पोलीसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.
कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिंचिंगचा प्रकार टळला असला तरी कार चालकाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. नौसी बसवत असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या