एक्स्प्लोर

Vasai Crime News : बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड; तब्बल 1 करोड 41 लाखांच्या औषधांसह मुद्देमाल जप्त   

Vasai Crime News : महाराष्ट्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. यात बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड करण्यात अन्न औषध प्रशासनाला मोठे यश आले आहे.

Vasai Crime News वसई : महाराष्ट्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. यात बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड करण्यात अन्न औषध प्रशासनाला (Food and Drug Administration) मोठे यश आले आहे. या कारवाईत तब्बल 1 करोड 41 लाखांच्या बनावट औषधांसह मोठ्या प्रमाणात इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 10 जुलै रोजी वसईच्या (Vasai Crime) गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि. कंपनीवर धाड टाकून 1 करोड 41 लाखांची औषधे आणि त्याला लागणा-या मशिनीरी, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, लेबल्स इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश एफडीएने केला आहे.

बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड

प्राप्त माहितीनुसार परवाना रद्द झाला असताना ही कंपनी औषधे उत्पादन करुन ते वितरित करीत होती. वसईच्या गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि.या कंपनीने हरयाणा येथील आयुर्वेदिक औषध उत्पादनाकरीता नियमाप्रमाणे परवाना घेतला होता. मात्र हा परवाना 14 मे 2024 रोजी रद्द झाला. दरम्यान हा परवाना रद्द झाला असला तरी, याच परवान्याचा वापर करुन वसई येथे अवैद्य रित्या ते औषधे बनवत होते. या परवाना अंतर्गत ते जालंधर येथील ओंकार फार्मा यांना औषधे विक्री आणि वितरण करत असल्याच दाखवत होते. परंतु ही कंपनी वसई येथेच होती. वसईहून औषध उत्पादन करुन, बिलावर जालंधर येथील पत्त्याचा ते उल्लेख करत औषध विक्रि करीत होते. ओंकार फार्मा यांच्या वसई येथे धाडीत काही औषधे असे आढळून आले आहेत की ज्यांच्या औषधाच्या लेबलवर गहरवार फार्मा वसई, पालघर म्हणून नाव नमूद होतं आणि त्याची उत्पादने दिनांक जानेवारी 2024 अशी नमूद केली होती. 

परवाना रद्द झाला असतानाही औषधांचे उत्पादना

या ठिकाणी केलेल्या कारवाईत ऋषभ मेडिसीन यांचा आयुर्वेदिक औषध उत्पादन करीता परवाना होता. मात्र तो परवाना 2022 रोजीच रद्द झाला होता. याच कंपनीविरुध्द मार्च 2024 मध्ये नवघर वसई येथे विना परवाना आयुर्वेदिक औषध उत्पादन केल्याप्रकरणी, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये एलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची  कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याची भागिदारी संस्था ऋषभ मेडिसीन नवघर वसई यांच्या विरुध्द 2021 मध्ये आयुर्वेदिक औषधांमध्ये एलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती. तसेत कोर्टात खटला ही दाखला केला होता. 

सध्या एफडीए या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. घटनास्थळी टाकलेल्या छाप्यानुसार, बनावट औषधे बनवणारी  कंपनी अनेक डुप्लिकेट उत्पादने बनवून विकत असल्याचे तपासात उघड होणार आहे. त्याच्या तारा कुठे जोडल्या आहेत, त्याचा ही तपास आता होणार असल्याची माहीती एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget