एक्स्प्लोर

Farmer Suicide : धक्कादायक! विदर्भातील 6 जिल्ह्यात 2001 पासून आतापर्यंत 27 हजार 324, तर गेल्या 6 महिन्यात 618 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Vidarbha Farmer Suicide : गेल्या काही वर्षांपासून पश्चिम विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी 2124 पासून 10 जुलै  2024 दरम्यान तब्बल 618 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Yavatmal News यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Vidarbha Farmer Suicide) होत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कमी पडलं आहे का असा प्रश्न या निमित्याने विचारला जात आहे. एकट्या पश्चिम विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी 2124 पासून 10 जुलै  2024 दरम्यान तब्बल 618 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्या आहेत. केंद्र सरकारने याविषयी गंभीर पावले उचलून आगामी बजेटमध्ये तात्काळ 1 लाख कोटींचा एकात्मिक पश्चिम विदर्भ कृषी कल्याण कार्यक्रमाची घोषणा करावी, अशी मागणी पश्चिम विदर्भाच्या शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी आज केलीय.

किशोर तिवारी हे 2015 ते 2022 या काळात राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे प्रमुख होते. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तिवारी यांनी एकात्मिक अहवाल तयार केला होता. मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी अहवालाला केराची टोपली दाखवल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर झाला असल्याचे तिवारी यांचे म्हणणे आहे. 

आगामी बजेटमध्ये तात्काळ 1 लाख कोटींचा घोषणा करावी- किशोर तिवारी

पश्चिम विदर्भ हे क्षेत्र पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या लागवडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. साधारण 1998 पासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर येऊ लागल्या आहेत आणि राज्य सरकारने हे कृषी संकट म्हणून दखल घेतली होती. 2001 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारने राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली. मात्र ठोस उपाययोजना केली नव्हती. 2004 साली या आत्महत्या सत्राने रौद्र रुप धारण केले. 2004 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी डॉ. स्वामिनाथन यांना दौरा करून अहवाल देण्यासाठी पाठविले.

भ्रष्टाचारामुळे सगळ्या घोषणा अयशस्वी झाल्या

त्यानंतर 2005 साली विदर्भासाठी 4,800 कोटींचे शेतकरी पॅकेज जाहीर करण्यात आले आणि 2008 मध्ये कृषी कर्ज माफ करण्यात आले होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील शेतकरी अडचणीचे सर्व मुद्दे निवडणुकीचे मुद्दे बनवून आश्वासने दिली. मात्र नोकरशाहीतील भ्रष्टाचारामुळे सगळ्या घोषणा अयशस्वी झाल्या. 

याचा फटका विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या गंभीर विषयावर मानवतेच्या दृष्टीकोनातून तोडगा काढण्याची गरज असून अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आगामी अर्थसंकल्पात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी 1 लाख कोटींचा एकात्मिक पश्चिम विदर्भ कृषी कल्याण कार्यक्रम सादर करण्याची मागणी किशोल तिवारी यांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget