शिरूरमधील बँकेवर भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींना बेड्या, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (Pune shirur bank robbery) येथील महाराष्ट्र बँकेवर पिस्तुलाचा धाक दाखवून पावणे तीन कोटी रुपयांच्या दरोड्यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
![शिरूरमधील बँकेवर भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींना बेड्या, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त Accused arrested by pune rural police who bank of maharashtra robbery in Shirur pune शिरूरमधील बँकेवर भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींना बेड्या, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/30/74264024464fdb539f4b7bbcf4f41346_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : भरदिवसा शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (Pune shirur bank robbery) येथील महाराष्ट्र बँकेवर पिस्तुलाचा धाक दाखवून पावणे तीन कोटी रुपयांच्या दरोड्यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 2 कोटी 19 लाखाचे सोने व 18 लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, अंकुर महादेव पावळे , धोंडीबा महादु जाधव , आदिनाथ मच्छिंद्र पठारे , विकास सुरेश गुंजाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
21 ऑक्टोबर रोजी दुपारी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दुपारी सव्वा एक वाजता सशस्त्र दरोडा पडला. 5 आरोपींनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून कॅशियरला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी बँकेतील 32 लाख 52 हजार 560 रोख रक्कम, 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किमतीचे 824 तोळे 130 मि.ग्रॅ. वजनाचे सोने असे एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेले होते. या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ 10 पथकं रवाना करण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा पडल्याने खळबळ उडाली होती. या दरोड्यात दीड कोटी रुपयांचे दागिने आणि तीस लाख रुपयांची रोकड असा 1 कोटी 80 लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडोखोरांनी हे कृत्य केलं. कारमधून दरोडेखोर आले. कानटोप्या घालत आलेल्या दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांच्या गाडीवर 'प्रेस' लिहिले होते.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास कारमधून चार दरोडेखोर बँकेच्या आतमध्ये गेले तर त्यांचा पाचवा साथीदार गाडीमधेच थांबला होता. त्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा धाकाने बँकेतील कर्मचाऱ्यांकडून 30 लाख रुपये आणि दीड कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दरोडा टाकल्यानंतर चोर शिरुरच्या दिशेने निघून गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर आधी शिरुरच्या दिशेने गेले. शिरुरमधून पुढे हे दरोडेखोर अहमदनगरच्या दिशेने गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)