एक्स्प्लोर

बारामतीत दारुचा ट्रक पलटी झाल्याचा बनाव करून दारु चोरली, दोघांना अटक

दोन दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे दारु वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती.

बारामती : दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करुन सर्व दारु चोरल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. 28 ऑक्टोबरला बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. या प्रकरणी बारामती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मॅकडॉल कंपनीमधून 28 ऑक्टोबरला दारुच्या बॉक्सचा 65 लाख 87 हजारांचा माल घेऊन एक ट्रक जात होता. उंडवडी कडेपठार या ठिकाणी या ट्रकच्या अपघाताचा बनाव करून ट्रकचा  चालक अंकुश बेंद्रे आणि मालक अजिनाथ जराड याने नंदकुमार क्षिरसागर याच्या मदतीने ट्रकमधील दारुचे 500 बॉक्स चोरले.  हा सर्व मुद्देमाल 40 लाखांचा आहे. या प्रकरणी चालक अंकुश बेंद्रे  व ट्रकचा मालक अजिनाथ जराड या दोघांविरोधात अपघाताचा बनाव करत अपहार केल्याचा गुन्हा  दाखल केला आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे दारु वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले होते. उंडवडी येथे घडलेल्या अपघाताची माहिती घेतली. चालकाला विचारलेल्या प्रश्नांवरून संशय निर्माण झाल्याने गुन्हे शोध पथकाने ट्रक कंपनी मधून निघाल्यापासून रोडचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. ट्रक हा पहिल्यांदा भवानीनगर या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरून गुन्हे शोध पथकाने कसून चौकशी केली असता फिर्यादींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपघाताचा बनाव करत, त्याचा मित्र नंदकुमार क्षीरसागर  याच्या गोडाऊनमध्ये तब्बल 500 दारुचे बॉक्स असा 40 लाखांचा माल ठेवण्यात आला आणि उंडवडी मधून जात असताना ट्रॅकला अपघात झाला असे भासवण्याकरीता ट्रॅक पलटी करून गावातील लोकांनी दारुचा मुद्देमाल उचलून नेल्याची फिर्याद दिली होती. 

गुन्हे शोध पथकाने सखोल तपास करत अपहार केलेला 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget