Ulhasnagar Dharmantar : दृष्टीची आयेशा कशी झाली? उल्हासनगरच्या मुलीचं ब्रेन वॉशिंग कुणी केलं?
Ulhasnagar Drishti Chaudhari Dharmantar : दृष्टीकडून मलेशियात फरार झालेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी हस्तगत करण्यात आल्या. तसेच कसाबनं केलेल्या 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात नोट्स सापडल्या.
![Ulhasnagar Dharmantar : दृष्टीची आयेशा कशी झाली? उल्हासनगरच्या मुलीचं ब्रेन वॉशिंग कुणी केलं? ulhasnagar dharmantar case drishti chaudhari relious conversion ayesha siddiqui hindu girl became muslim marahi news Ulhasnagar Dharmantar : दृष्टीची आयेशा कशी झाली? उल्हासनगरच्या मुलीचं ब्रेन वॉशिंग कुणी केलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/33d7e33f51101da354580b513139618d172365989334793_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : गेल्या काही दिवसांत लव्ह जिहादचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक काळीज पिळवटून टाकणारा आणि धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. दृष्टी नावाच्या हिंदू मुलीनं मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि आयेशा सय्यद हे नाव धारण केलं. मात्र तिने हे सगळं करताना जन्मदात्यांविरोधात तक्रारीही केल्या. त्यामुळे हे सगळं करताना दृष्टीवर कुणाचा दबाव होता का? आणि आयेशाचं ब्रेन वॉशिंग कुणी केलं? असे अनेक प्रश्न ऐरणीवर आलेत.
आपल्या लेकीच्या चिंतेनं दृष्टीच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. पण ज्या लेकीसाठी जीव तीळ तीळ तुटतोय, त्याच लेकीविरोधात उल्हासनगरच्या कल्पना चौधरींना कोर्टाची पाय चढावी लागलीय. ही कहाणी जेवढी भावनिक आहे तेवढीच धक्कादायक आहे.दृष्टी चौधरी असं त्या मुलीचं नाव, पण ही 2022 पर्यंतची ओळख. कारण दृष्टीचं धर्मांतर झालं असून तीनं स्वतःचं नाव आएशा सय्यद असं बदललंय.
दृष्टीची आयेशा कशी झाली? (Drishti Chaudhari Became Ayesha Siddiqui)
- उल्हासनगरच्या दृष्टी चौधरीने 2022 मध्ये मुस्लिम प्रथेनुसार रोजे ठेवल्याने कुटुंबाला संशय आला.
- आई लंडनला गेली असता बनावट कागदपत्रांच्या आधारे दृष्टीचं धर्मांतर करण्यात आलं.
- धर्मांतरावेळी पालक म्हणून दुसरंच दाम्पत्य उपस्थित केल्याचा दृष्टीवर आरोप आहे.
- धर्मांतरानंतर दृष्टीच्या नावात बदल करण्यात आला आणि आयेशा सिद्दीकी असं नाव ठेवण्यात आलं.
- धर्मांतरानंतर आई, वडील यांच्याविरोधात दृष्टीकडून पोलिसांत खोटी तक्रार देण्यात आली.
- दृष्टीच्या साथीदारांनी तिच्या आईला गरम चाकून चटके दिल्याचा आरोप करण्यात आला.
- दृष्टीला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना हिंदू दहशतवाद्यांची उपमा देण्यात आली.
आईच्या पाठपुराव्यानंतर दृष्टी चौधरी, सलीम चौधरी,काझी इलियास निझामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण प्रकरण दहशतवादीविरोधी पथकाकडे देण्यात आलं. सध्या तिन्ही आरोपींना जामीन मिळाला आहे.
दृष्टीकडून मलेशियात फरार झालेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी हस्तगत करण्यात आल्या. कसाबनं केलेल्या 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात नोट्स सापडल्यानं तपास यंत्रणाही अवाक् झाल्या.
दृष्टीबरोबरच तिच्या आईवरही धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता असा आरोप केला जातोय.
मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव
कोणत्या दबावापोटी दृष्टीनं मुस्लिम धर्म स्वीकारला, कोणत्या ब्रेनवॉशनंतर दृष्टी जन्मदात्यांनाच शत्रू मानू लागली असे प्रश्न विचारताना दृष्टीच्या आईला दुःख अनावर होतं. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मलेशियात लपून बसलेला झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडीज् सापडल्या आहेत. एवढंच नव्हे तर 26/11 हल्ल्यासंदर्भातील काही नोट्सही आढळून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात एनआयएनं तपास करावा अशी मागणी होतेय
दृष्टी चौधरीनं खरंच स्वमर्जीने धर्मांतर केलं आहे का? की या प्रकरणाचे धागेदोरे वेगळ्याच प्रकरणाशी जोडले गेलेत? आता या प्रश्नाचं उत्तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या तपासयंत्रणांना शोधावं लागणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)