'दृष्टी'ची झाली आयेशा... ट्यूशनमधून ओळख वाढवली, ब्रेन वॉश केलं, उल्हासनगरमधील हिंदू तरुणीचं धर्मांतरण; दोघांना अटक
दृष्टीकडून मलेशियाला फरार झालेला झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी सापडल्यात. तसंच मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात काही नोट्स सापडल्यात.
उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar News) शहरात केरला फाईल या हिंदी चित्रपटात घडलेल्या कथेप्रमाणे काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. मुंबईलगतच्या ठाण्यातल्या उल्हासनगरमधल्या दृष्टी चौधरीची... 2022 पर्यंत ती दृष्टी चौधरी होती. मात्र आता ती आयेशा सिद्दीकी झाली आहे. तिला फूस लावून तिचं धर्मांतर करण्यात आल्याचा तिच्या आईचा आरोप आहे. आईनं केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी या महिन्यात गुन्हा दाखल केलाय. आयेशा सिद्दीकी म्हणजेच धर्मांतरापूर्वीची दृष्टी चौधरी, तिचे साथीदार सलीम चौधरी आणि काझी इलियास निझामीविरोधात गुन्हा दाखल झालाय. सध्या हे जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलाय. कारण दृष्टीकडून मलेशियाला फरार झालेला झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी सापडल्यात. तसंच मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात काही नोट्स सापडल्यात.
जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहून इस्लामचे शिक्षण
दृष्टी ही युट्युबवरील जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायची. दृष्टी आणि शबाना शेख या नितनवरे यांच्या घरी त्यांच्या मुली बरोबर अभ्यास करायला जायची. रात्री उशीरापर्यंत अभ्यास करून कधी कधी त्यांच्या घरी झोपायची, त्यावेळी शबाना शेख ही इस्लामचे शिक्षण देत होती, असे फिर्यादीमध्ये कल्पना चौधरी यांनी नमूद केले आहे. तसेच नितनवरे यांची मुलगी आणि दृष्टी हीचा बुरखा घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेजारच्या एका बाईने दाखविला होता. त्यावर दृष्टीने बुरखा घातलेल्या फोटोबाबत विचारणा केली, त्यावर तिने सहजच तो फोटो काढलेला आहे असे सांगत दृष्टीने विषय उडवून लावला होता.
मुस्लिम धर्म स्वीकारला अन् ...
26 जून 2022 रोजी डॉ.सपना भिसे यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्या सोबत कल्पना चौधरी या लंडनला गेल्या होत्या. 18 नोव्हेंबर 2022 रोजी लंडन येथून भारतात परतल्या. तेव्हा दृष्टी हिने धर्मांतरण करून मुस्लिम धर्म स्वीकारल्या बाबतचे शाहदत पत्र कल्पना चौधरी यांना दाखवत घर सोडून निघून गेली. त्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जीद ट्रस्ट, मुस्लीम जमात असा शिक्का होता. मुलगी दृष्टी ही परत घरी आली नाही म्हणून 29 नोव्हेंबर 2022 रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे जाऊन दृष्टी ही हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा दृष्टीला पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. तिने तिथे मी मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचे सांगत कल्पना यांच्या बरोबर घरी आली. त्यावेळी अनिना खान ही कल्पना चौधरी यांच्या जवळ आली. इस्लाम धर्म हा चांगला असल्याचे कल्पना यांना समजावू लागली. त्यावेळी माझ्या मुलीने जर इस्लाम धर्म स्वीकारला असेल तर तिला रॉकेल टाकून जाळून टाकेन असे अमिना खान हिला कल्पना चौधरी म्हणाल्या. तेव्हा मुलीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही, अन्यथा मस्जिवाले येऊन तुमच्या नाका तोंडातून रक्त काढतील, अशी धमकी अमीना खान हिने कल्पना चौधरी यांना दिली.
गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा आईला संशय
त्यानंतर मुलीने अनेक वेळा फोन वरून संपर्क करून पैशाची मागणी केली. तसेच वडिलांच्या खात्यातून अनेक वेळा रक्कम काढून घेतली. कल्पना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी दृष्टी हिची बुध्दी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लीम बनवले जात आहे, तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय वाटत होता. तसेच दृष्टीकडून 'काफिर', 'जिहाद' असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाज विघातक, राष्ट्र विघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबियांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत गुरुवारी रात्री सृष्टी चौधरी, सलीम चौधरी, शबाना शेख, शबाना शेख हिची मुलगी महेक शेख, शबाना शेखची बहिण अमिना, अफिदा खातुन, अफिदा खातुनचा पती वसिम शेख, बाबु दास, काझी इलियाज निजामी, ॲड. कमरूदिदन अन्सारी या दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दोन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
त्यापैकी आरोपी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना आज विठ्ठलवाडी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या बाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कल्पना चौधरी यांना अश्रू अनावर झाले. मला दृष्टी ही एकच मुलगी आहे, ती मला परत हवी आहे असे म्हणत त्यांनी टाहो फोडला.
हे ही वाचा :