Crime News : 'क्राईम पेट्रोल'चे 1300 हून अधिक एपिसोड पाहिले, मग प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट; दोन वर्षानंतर आरोपीला अटक
Crime News : प्रेयसीला संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी क्राईम पेट्रोलचे 1300 एपिसोड पाहिले. मात्र, पोलिसांनी दोन वर्षानंतर आरोपीला अटक केली.
Crime News : अनेकदा हत्येच्या अशा घटना उघडकीस येतात ज्यामुळे लोक हादरून जातात. मारेकरी पोलिसांपासून पळून जाण्यात यशस्वी होतो. त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या आणि पद्धती अवलंबतो. त्यामुळे पोलीस आणि आरोपींमध्ये पकडापकडीचा खेळ हा अनेक वर्ष सुरूच असतो. मात्र, आरोपी कितीही हुशार असला तरी पोलिसांनी निर्धार केला तर त्याला बेड्या घालण्यात यशस्वी ठरतात. अशीच एक घटना समोर आली आहे. आरोपीने प्रेयसीला संपवण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोलचे एपिसोड पाहिले आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र, पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या.
राहुल राज चतुर्वेदी असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपण एका मंदिराचे पुजारी असल्याचा दावा केला आहे. आरोपी राहुल राज चतुर्वेदी हा भानुप्रिया या महिलेसोबत वास्तव्य करत होता. मात्र, तिच्यासोबत एका गोष्टीवरून वाद झाल्याने त्याने 2021 मध्ये तिची हत्या केली. मात्र, भानुप्रियाची हत्या केल्यानंतरही दोन वर्ष पोलिसांपासून वाचला होता. मात्र, प्रताप नगर पोलिस स्टेशनने राहुल राजला शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केली.त्याच्या हालचाली आणि वागणुकीवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर भानुप्रिया हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला.
शरीराचे तुकडे करून....
उदयपूरचे पोलीस अधीक्षक भुवन भूषण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भांडणानंतर भानुप्रियाची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे भयावह षडयंत्र रचण्यात आले. त्याने क्राईम पेट्रोलचे एपिसोड 1300 हून अधिक वेळा पाहिले. त्यानंतर मृतदेह लोखंडी ड्रममध्ये ठेवून वर सिमेंटने बांधून ठेवले.
तो काही कामानिमित्त बाहेर गेला असताना ड्रमला छिद्र पडले. त्यामुळे खोलीत दुर्गंधी येऊ लागली. यावर घरमालकाने त्याला बोलावून साफसफाई करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी घरमालकाला संपूर्ण हकीकत सांगितली. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर त्याला घरमालकाचाही पाठिंबा मिळाला. दोघांनी मिळून भानुप्रियाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळले. त्यानंतर इतर पुराव्यांसह तिच्या मृतदेहाची राखही नदीत विसर्जित केली.